जिल्हास्तरीय आमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धा

0

जळगाव। नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा संकुल समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या सहकार्याने गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी 28 मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय आमंत्रित हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरूष व महिला यांचे 10 संघ आमंत्रित केले जाणार आहे.

ज्या संघांना स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी 26 मार्चपर्यंत आपल्या संघांची नोंदणी करणे गरजेचे आहे. या स्पर्धेस कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नाही. प्रथम पारितोषीकपाच हजार, द्वितीय पारितोषीक तीन हजार पुरुष संघासाठी ठेवण्यात आले आहे. महिलासंघासाठी प्रथम पारितोषिक दोन हजार, द्वितीय एक हजाराचे पारितोषीक ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुरुष संघातील उत्कृष्ट खेळाडूला पाचशे रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.