जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत चिखलीचा संघ विजेता

0

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमीत्त स्पर्धा उत्साहात

भोसरी : पुणे जिल्हा कब्बडी असोशिएशनच्या मान्यतेने आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमीत्त जिल्हास्तरीय भव्य कब्बडी स्पर्धा खेड येथे पार पडली. शुक्रवार दि. 9 ते 10 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साही वातावरणात दोन दिवस हि स्पर्धा रंगली. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक नामांकित संघांनी सहभाग नोंदविला होता. यात, चिखलीच्या ब्रह्म-विष्णू-महेश या संघांने प्रथम क्रमांक पटकाविला.

रहाटणीचा संघ उपविजेता…

स्पर्धेत द्वितीय क्रमांक महा राजू संघ (रहाटणी), तृतीय क्रमांक – उत्कर्ष संघ (पुणे), चतुर्थ -अतुलदादा बेंनके संघ, जुन्नर यांनी मिळवला. यावेळी, आमदार महेश लांडगे, सभापती लक्ष्मणराव टोपे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव, उपसभापती सुरेखा टोपे, लोकनियुक्त सरपंच वैशाली जरे, तंटा मुक्ती अध्यक्ष दत्तात्रय जरे, उद्योजक पांडुरंग साने, नगरसेवक दिनेश यादव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीतेसाठी यांचे सहकार्य…

दोन दिवसीय स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी भैरवनाथ कब्बडी संघाचे राष्ट्रीय खेळाडू सतीश जरे, अध्यक्ष योगेश टोपे, उपाध्यक्ष सचिन जरे, कार्याध्यक्ष निलेश जरे, खजिनदार पवन जरे यांनी यांचे सहकार्य लाभले. संपत गरगोटे, संदीप टोपे यांनी सूत्रसंचालन केले. भैरवनाथ कब्बडी संघाचे राष्ट्रीय खेळाडू सतीश जरे, योगेश टोपे यांनी आभार मानले.