जळगाव । मोदी सरकारला चार वर्ष पुर्ण झाल्याने या चार वर्षातील कामगीरी ही अपयशी असुन आश्वासन पुर्ण करु शकले नसल्याने तसेच शेतकरी कर्जमाफी, पेट्रोलवाढ अश्या अनेक समस्या जनतेला त्रस्त झाल्यामुळे विश्वासघात दिवस म्हणुन साजरा केल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदिपभैय्या पाटील यांनी सांगितले. मुकमोर्चाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महानगराध्यक्ष अर्जुन भंगाळे, महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, प्रदेशाध्यक्ष उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अॅड. ललिता पाटिल, गणेश पाटिल, शरद महाजन, जि.प.आरोग्य सभापती दिलीप पाटिल, शहर उपाध्यक्ष शाम तायडे, अमजद पठाण, पराग पाटील, कल्पेश अहमद आदी उपस्थित होते.
सत्ताधारी सरकारच्या अकार्यक्षमतेवर ठेवले बोट
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारला चार वर्ष पर्णत्ववास येत असल्याने या चार वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकार पुर्णपणे अपयशी ठरले असुन निवडणुकांच्या वेेळी दिलेली आश्वासने सत्तास्थापनेनंतर पुर्ण न केल्याने अपयशी ठरले असुन याउलट जनतेच्या पैशांतुनच हजारो कोटींच्या जाहिरातींवर खर्च करुन उत्सव साजरी करीत आहेत, पण हा नेमका कोणता उत्सव आहे. मोदी म्हणाले होते, परदेशातील 80 लाख कोटी काळा पैसा असुन तो परत आणुन प्रत्येकाच्या खात्यात जमा करु याचे काय झाले?, छत्तीसगड मधील 36 हजार कोटीच्या रेशन घोटाळ्याचे काय झाले?, विजय माल्या, ललीत मोदी, निरव मोदी यांना देशातुन पळवण्याची घटना देशाचा विश्वासघात नाही का?, लोकांचा पैसा बॅहकेत सुरक्षित आहे का?, असे प्रश्न उपस्थीत करुन सत्ताधारी सरकारच्या अकार्यक्षमेतेवर बोट ठेवले.
शेतकर्यांच्या आत्महत्येत वाढ
घोटाळेबाज पैसा घेवुन परदेशात पळुन जात असतांना दुसरीकडे बँका ठेवींवरील व्याज कपात करीत आहेत, व शेतकर्यांना कर्जमाफी द्यायला 2 लाख कोटी नाहीत असे सांगतात पण 12 उद्योगपतींना 2 लाख 41 हजार कोटींचे कर्ज मात्र माफ केले जाते. हे सरकार आल्यापासुन शेतकरींच्या आत्महत्यांमध्ये 41.7 टक्के वाढ झाली व चार वर्षाच्या कार्यकाळात 44 हजारहुन अधिक शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या. दरम्यान, महाराष्ट्रातुन 15 हजाराहुन अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे हा विश्वासघात नाही का. 8 कोटी बरोजगारांना नोकर्या देण्याएवजी फक्त 8 लाख तरुणांना नौकरी देतात हा देखील तरुणांचा विश्वासघात नाही का? असा सवाल उपस्थीत केला. दलीत अल्पस्ंख्यांक, आदिवासी, यांच्यावर रोज अत्याचार होत असतात, त्यांना सुरक्षा देण्याचे आश्वासन फोल ठरले.
या विषयांकडे वेधले लक्ष
कॉग्रेसच्या पंजाब, कर्नाटक सरकारने शेतकर्यांसाठी कर्जकमाफी केली. मात्र भाजप शासित राज्य महाराष्ट्र, उत्तरप्रदेशात कर्जमाफीची घोषणा फक्त नाावापुरती असुन अजुन शेतकर्यांना कर्जमाफी दिली गेली नाही. ना खाऊंगा और न खाने दुंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाराचे संरक्षक बनले. 4 वर्षात कृषि, उद्दोग, बेरोजगारी, कृषिमाल हमीभाव, पिकविमा, कर्जमाफी, पेट्रोल डिझेलचे दरात सातत्याने होणारी वाढीची अनिमियतता आणुन भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला असल्याने 26 मे हा दिवस जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस पक्षाच्या वतीने विश्वासघात दिवस म्हणुन साजरा करीत असल्याचे काँग्रेस कमिटीच्या वतिने सांगण्यात आले,