जिल्हा कारागृहात विविध कार्यक्रम

0

धुळे । येथील जिल्हा कारागृहात बंदी कल्याण अंतर्गत विविध कार्यक्रम नुकतेच झाले,जिल्हा कारागृहाच्या नदी बाग शेती परिसरात जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी परिसरात 200 रोपांची लागवड करण्यात आली. कारागृह अधीक्षक श्री. आगे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी बी.डी. श्रीराव,डी. व्ही. आगे, वैद्यकीय अधिकारी पी. एफ. सोनजे, एच. एस. पोतदार उपस्थित होते.

एचआयव्ही व दंत चिकीत्सा शिबिर
कारागृहात राज विद्या केंद्र, दिल्लीच्या धुळे शाखेतर्फे प्रेम रावत यांच्या शांतीचा संदेश या विषयावरील प्रवचनाची चित्रफित दाखविण्यात आली. भरत फुलपगारे यांनी संस्थेची माहिती दिली. जिल्हा कारागृहात एच. डी. एफ. सी. बँकेच्या देवपूर शाखेचे व्यवस्थापक श्री. देवगावकर, विक्री अधिकारी श्री. चित्ते यांनी वेतन खाते, त्यापासून मिळणारे लाभ, कर्ज,व्याजदरासह बँकेच्या कार्य प्रणालीविषयी मार्गदर्शन केले.जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे यांच्यातर्फे एचआयव्ही तपासणी शिबिर झाले. प्रा. डॉ. अडचित्रे यांनी मार्गदर्शन केले.जिल्हा कारागृहात महावीर जैन युवक संस्थेच्या धुळे शाखेतर्फे दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री. पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कारागृहाचे अधिकारी,कर्मचारी, बंदी उपस्थित होते.