जळगाव : पोलिसांच्या तावडीतून आरोपी निसटल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांचे नुकतेच निलंबन केल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अमित राजू तडवी व ईश्वर संजय भालेराव अशी निलंबित कर्मचार्यांची नावे आहेत. दरम्यान, पसार संशयीताला गुरुवारी अकोल्यातून गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पोलिसांच्या हातावर तूरी देत पलायन
भालेराव व तडवी भुसावळ उपकारागृहात कैदी पार्टी म्हणून ड्युटी लावण्यात आली होती. संशयीत महेश शिवदास दिक्षे (रा.लोणी, ता.रीसोड, जि.वाशीम) यास मोबाईल चोरीप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आल्याने दोन्ही कर्मचारी कैदी पार्टी म्हणून भुसावळ कारागृहातून जळगाव कारागृहात संशयीताला ट्रान्सफर करीत असताना जेल अधिकार्यांशी कर्मचारी संवाद साधत असताना संशयीताने ळ काढला होता. जिल्हा पेठ पोलीस कारागृहाच्या ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी दोन्ही कर्मचार्यांचा कसुली अहवाल आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली.