जळगाव । येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेता यावे या हेतुने जळगाव जिल्हा गट सचिव व संवर्गीकृत कर्मचारी संघटनेने एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
याप्रसंगी जळगाव जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व संचालक मंडळ व गटसचिव प्रतिनिधींचा समावेश होता. राज्यातील गटसचिवांनी गेल्या पंधरवड्यापासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले.