जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्थेतर्फे विधवांना साडी वाटप

0

नवापूर । शहरातील वनिता विद्यालयात महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ संचलित नंदुरबार जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्था नंदुरबारतर्फे दिवाळी व भाऊभीजनिमित्त नवापूर शहरातील नाभिक समाजातील 24 विधवा महिलांना साडी आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. तसेच नाभिक समाजातील बेटी बचाव अभियानाचे प्रमुख प्रदीप हिरे व भाग्यश्री हिरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नंदुरबार जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

नाभिक समाजातील विविध कार्यक्रम
प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक समाज जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे, अखिल भारतीय जीवा सेनेचा महिला अध्यक्षा मिनाक्षी भदाणे, कैलास खोंडे, माजी महिला अध्यक्ष पोर्णिमा खोंडे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पी.टी सोनवण दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील,नवापूर नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम, उपाध्यक्ष हिंमाशु बोरसे,सचिव विनायक सुर्यवंशी, देविदास हिरे, प्रदीप हिरे, संदीप हिरे, भरत सैंदाणे, आशिष सोनवणे, नवयुवक अध्यक्ष अनिल वारूडे मुकेश वारूडे, संदीप सोनवणे,जितेंद्र भदाणे, राकेश भदाणे, अशोक सैंदाणे, प्रभाकर शिरसाठ, रवींद्र सोनवणे, रविंद्र सैंदाणे, अशोक सैंदाणे, दगूबाई सोनवणे, जिजाबाई हिरे, जयश्री निकम, भाग्यश्री हिरे, वंदना हिरे, शितल वारूडे, सीमा महाले,ज्योती सैंदाणे, सरला सोनवणे,शैला सैंदाणे आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाभिक समाज जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे यांनी सुत्रसंचालन विनायक सुर्यवंशी व अशोक सैंदाणे यांनी केले. आभार सुधीर निकम यांनी मानले.