चिंबळी । पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतिने आयोजित इंग्रजी अध्ययन समृध्दी उपक्रमात भोसे येथील स्पर्धेत बिट पातळीवर कुरुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील चौथीचा विद्यार्थी आलिशा जुबेर पठाण या विद्यार्थ्याने इंग्रजी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तर चाकण येथे बिट पातळीवर झालेल्या कविता गायन स्पर्धेत सातवीतील विद्यार्थ्याचा द्वितीय क्रमांक आला. संस्कृती गुरव या विद्यार्थिनीने शब्दसंपत्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. कथा सागंणे स्पर्धेत प्रतिक मिसाळ या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला.
चाकण येथे झालेल्या तालुका पातळीवर खेड तालुक्यातील आठ बीटमधील स्पर्धेत हे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कुरुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीमधील आलिशा पठाण या विद्यार्थिनीचा तालुका पातळीवर इग्रंजी निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला आहे. कथा स्पर्धेत तिसरीमधील प्रतिक मिसाळ व सातवीमधील सुप्रिया काबंळे या विद्याथिर्र्नीचा दुसरा क्रमांक आला. इग्रंजी शब्द स्पर्धेत चौथीमधील संस्कृती गुरवचा दुसरा, इंग्रजी शब्द स्पर्धेत संपंत्ती सोनकाबंळेचा तिसरा, डल्बू एच स्पर्धेत सातवीतील सुप्रिया काबंळे, इग्रंजी निबंध स्पर्धेत मनिषा गवलवाड यांचा तिसरा, इग्रंजी नाट्यस्पर्धेत सातवीमधील विद्यार्थ्याचा दुसरा क्रमांक आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षिका सुनिता बुरगे, वैशाली रणपिसे, अनिता शिंदे, सुर्वणा वाघमारे, संगिता ढगे, उमा पाटील, वैशाली पोटे यांचे सरपंच चंद्रकांत बधाले, उपसंरपच अमित मुर्हे, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकात सोनवणे, उपाध्यक्ष किशोर बागडे, नवनाथ मेमाणे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.