नवापूर । नंदुरबार जिल्हा परिषदेचा अध्यक्षा रजनीताई नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक,स्वीय सहायक जिजाबराव जाधव आदींनी नर्मदा काठावरील गावांना भेटी देऊन पाहणी केली. सरदार सरोवर जवळील तरंगता दवाखाना, अक्कलकुवा तसेच नर्मदा धरणावरील औषध उपचार करणारी बोटिवर भेट दिली. तसेत नर्मदा नदीतुन बोटीद्वारे मनीबेली या गावाला भेट दिली. तसेच तेथील घरे व गांवकरी यांना भेटुन त्यांचा समस्या जाणुन घेतल्या. गावकर्यांची आस्थेवाईकपणे चर्चा केली. तेथील लोकांनी या भागातील समस्या सांगुन येथे संर्पदंशाचे रुग्ण जास्त असल्याचे सांगितले. येथे योग्य उपचार मिळत असल्याचे सांगितले व समाधान व्यक्त केले. यावेळी रजनीताई नाईक व सुहास नाईक यांनी सुमारे 2 ते 3 किलोमीटर भरपावसात पायी चालत आजुबाजुला असलेल्या गावांना ही भेटी दिल्या.
जलतरंग दवाखान्याची पहाणी
दोन बोटींमध्ये असलेला जलतरंग दवाखाना याची देखील पहाणी करुन त्यामध्ये असलेल्या सोयीसुविधा, औषधी याची ही पहाणी करुन संबधीत डाँक्टरांशी चर्चा केली. त्यांनी ही यावेळी सविस्तर माहीती दिली. यावेळी भेट दिली असता डॉ.अनिल पाटील, डॉ. संदीप काकुस्ते हे कार्यालायीन कामकाज करीत होते. अध्यक्षा रजनी नाईक यांचा सोबत उपाध्यक्ष सुहास नाईक, जि प सदस्य किरसिंग वसावे, डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी हे देखील उपस्थित होते. या भागातील नर्मदा काठवरिल मानिबेली येथे भेट देऊन गांवकरी यांच्याशी सवांद केला असता आरोग्य सेवा मिळते किवा नाही याबाबत तसेच पावसाचे दिवस असल्याने सर्पदंशांचे प्रमाण जास्त असते त्याच्यांवर वेळेवर उपचार होतोबाबत गावकर्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या भागातील आंगणवाडी, जि. प. शाळा विषयी चर्चा केली.