नवापुर । नवापुर तालुक्यातील मौजे पायरविहिर येथील जि.प मराठी शाळेत शिक्षक उपलब्ध करुन देणे बाबतचे निवेदन तहसिलदार प्रमोद वसावे यांना सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे देण्यात आले. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, नवापुर तालुक्यातील मौजे जामतलाव ग्रामपंचायत अंतर्गत पायर विहिर गावात पुर्वीपासुन जि.प प्राथमिक शाळा व्यावस्थित सुरु होती. परंतु या चालु शैक्षणिक वर्ष जुन महिन्यापासुन या शाळेत शिक्षक येत नसल्यामुळे सदर शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहत आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
या विद्यार्थ्यांंना जवळपास दुसरी शाळा नसल्यामुळे या शाळेतील 21 विद्याथ्यार्ंचा शैक्षणिक नुकसान होत आहे. या विद्यार्थ्यांना जुन महिन्यापासून काहीच शिकविले गेले नसल्याने त्यांचे वर्ष वाया जात आहे. तरी पायर विहिर गावातील शाळेला ताबडतोब शिक्षक उपलब्ध करुन शाळा सुरु करण्यात यावे अन्यथा सत्यशोधक व पायर विहिर गावातील सर्व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला होता. या प्रकणात ताबडतोब लक्ष देवून कार्यवाही करुन विद्यार्थ्याना न्याय द्यावा असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
अनेकांना मिळाला न्याय
प्रमोद वसावे नवापूर यांनी तहसीलदारपदाचा पदभार घेतल्यापासुन तालुक्यातील अनेक प्रश्न तातडीने सुटु लागले आहेत. ते आल्या पासुन अनेक निवेदन येऊ लागली जी योग्य आहेत त्यावर वसावे यांनी गंभीर पणे लक्ष देऊन ते सोडवले आहेत. अनेक प्रश्न सोडवुन संबधितांना त्यांनी न्याय मिळुन दिला आहे. तहसीलदार वसावे यांना भेटा काम झालच म्हणुन समजा यांचा प्रत्यय पुन्हा आला आहे. याबाबत समाधान व्यक्त होत आहे
गावकर्यांसोबत तातडीची बैठक
निवेदनावर कॉ.रामा गावीत,कॉ रमेश गावीत,कॉ.जोत्या गावीत,कॉ.गोबजी गावीत,,कॉ.गेवाबाई गावीत,पोलिस पाटील विजय गावीत,मनेष गावीत,धेडया गावीत,ईलाश गावीत,रेहमु कोकणी,कमु गावीत,राहुल गावीत यांचा सह्या आहेत. तसेच निवेदन दिल्यानंतर तहसिलदार प्रमोद वसावे यांचाशी चर्चा करण्यात आली. यानंतर तहसीलदार प्रमोद वसावे यांनी लक्ष घालुन पंचायत समिती सभापती सविता गावीत,उपसभापती दिलीप गावीत,पंस सदस्य जालमसिंग गावीत, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,गटशिक्षण अधिकारी डॉ. राहुल चौधरी, केंद्र प्रमुख व सत्यशोधकचे कार्यकतेे कॉ.रामा गावीत,रमेश गावीत,जोत्या गावीत,गेवाबाई गावीत,पोलिस पाटील,सह गावकर्यांबरोबर तातडीची बैठक घेऊन सदर शाळेत स्वतः जाऊन प्राथमिक चौकशी करण्यासाठी दुपारी 3 वाजता भेट देऊन चर्चा केली. या चर्चेत विद्यार्थी व पालकांशी करण्यात येऊन सदर शाळेवर एका आठवडयात शिक्षक उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
शासनाच्या आदेशाला केराची टोपली
राज्य व केंद्र सरकारतर्फे सर्व शिक्षण अभियान अंतर्गत शिक्षणासाठी कोट्यांवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. यात शासनातर्फे एकही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये, असा उद्देश आहे. परंतु शासनाच्या आदेशाला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविली आहे. याबाबत अनेकदा गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना ग्रामस्थांनी लेखी तक्रार व ग्रामसभेचा ठराव देण्यात आलेला आहे. परंतु शाळा उघडुन ऑगस्ट महिन्या संपण्यात आला आहे. तरी पण साधा एक शिक्षक उपलब्ध करुन देण्यात यंत्रणेला अपयश आले आहे.