भुसावळ । तालुक्यातील साकरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 9 ते 15 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी कविता गायन, गोष्टी सादरीकरण, विविध म्हणी, मराठी समानार्थी शब्द, ओव्या, भारुडे, पोवाडे, वाचन, उपक्रम, तीन-चार शब्दांवरुन गोष्ट तयार करणे, चित्रांवरुन कथा, लोकगीते, विविध नेत्यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या. उपशिक्षिका पौर्णिमा राणे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध सणांच्या आरास साकारण्यात आल्या होत्या. यासाठी सुनिता कोळी, विनायक कोल्हे, रुपाली जावळे, निशा पाटील, पुर्णिमा नेमाडे यांनी परिश्रम घेतले. पौर्णिमा राणे यांनी तयार केलेल्या त्रिमितीय चित्रांमधून विविध संतांची व महाराष्ट्राचा इतिहास यांचे सादरीकरण झाले. तसेच महाराष्ट्राच्या भुपाळीचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यात आले.
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा व संस्कृती समृध्द करण्याचा आनंद मराठीत आहे. मातृभाषा वाढवायची असेल तर भाषेचा वापर वाढविला पाहिजे. – पौर्णिमा राणे, उपशिक्षिका