जिल्हा परीषदेच्या लाचखोर लिपिकाला दोन दिवसांची कोठडी

0

जळगाव- सेवाविृत्त कर्मचार्‍याची फाईल त्रृट्यांची पुर्तता करून पुढे सरकावण्यासाठी तीन हजारांची लाच मागणार्‍या जळगाव जिल्हा परीषदेतील बांधकाम विभागातील वरीष्ठ लिपिक देविदास ओंकार सोनवणे (57, वाघ नगर, जळगाव) यास जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी एक वाजता लाच घेताना अटक करण्यात आली होती. सोनवणे यांना शनिवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.