जिल्हा परीषदेवर पुन्हा वर्चस्व सिद्ध करा

0

जळगाव । महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला वाढविण्यासाठी एकनाथराव खडसे यांचे मोठे योगदान आहे. आगामी होणार्‍या पंचायत समिती, जिल्हा परीषद व पदवीधर मतदार संघासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने काम करा, कोणतेही मतभेद न करता तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत पोहचा. पक्षात ‘मतभेद जरूर असतील मात्र मनभेत नाही’ असा खुलासा महसुल मंत्री तथा पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी केला. दुपारी 2 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सर्व आमदारांच्या उपस्थितीत निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर सर्व तालुक्यातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.नाना पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार राजूमामा भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूभाई पटेल, माजी खासदार चंद्रकांत सरोदे, श्रीकांत खटोड, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर, पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.प्रशांत पाटील, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानाचे समन्वयक अस्मिता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपापसातील मतभेद विसरा – पालकमंत्री
दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत सत्ता असून देश बदलत आहे. शेतकर्‍यांसाठी ‘अटल पेन्शन योजने’च्या माध्यमातून सुरू करण्यात आली, ग्रामीण भागातील कुटूबांसाठी देशात 5 कोटी गॅस कनेक्शनचे वाटप मोफत करण्यात आले, ओबीसी साठी स्वतंत्र्य मंत्रालया व्हावे यांसाठी एकनाथराव खडसे यांची मागणी होती ती मिळाली, 6 लाख रूपये वार्षीक उत्पन्न असलेल्या ओबीसी समाजाच्या मुलांची शिक्षणाची फि 50 टक्के कमी करण्यात आली, नुकतेच मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीत ‘सारथी इंन्ट्रान’ आणि ‘मागास आयोग’ घोषीत करण्याचे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. या सारखे अनेक बदल देशात होत असून जोपर्यंत भाजपाच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत काही ना काही बदल राहणार आहे. येणार्‍या काळात पंचायत समिती, जिल्हा परीषद व पदवीधर मतदार एकत्र येणाची गरज आहे. नुसते गळ्यात गळा घालून उपयोग नाही. कार्यकर्त्यांनी प्रत्यक घरापर्यंत जावे, ना. महाजन आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कार्यकर्त्यांनी चिंता करू नये अशी माहीती पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.

अपेक्षेपेक्षा जास्त सदस्या निवडून आणा – ना. महाजन
पदवीधर मतदार संघाचा विचार जर केला काही काळ वगळता हे पद भाजपाकडेच होते अशी माहिती जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन वेळी हे पद भाजपाकडे नव्हते मात्र आता हे पद आपल्याकडे घ्यायचे आहे. गेल्यावेळी पैसे वाटून अनेक बोगस मतदान झाले होते, पदवीधर मतदान संघासाठी डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांना चांगल्या मतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून जोमाने कामाला लागावे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात इतर पक्षांतील कार्यकर्ते व पंचयात समितीचे सदस्यांनी प्रवेश केला आहे. तसेच जि.प. आणि पं.स. असलेल्या 69 जागांपैकी 40 जागांवर विजय मिळवून एक होती सत्ता मिळविणार असल्याची ग्वाही उपस्थितांना दिली. जिल्ह्यात आता अनुकुल वातावरण आहे याचवेळी जळगाव हा भाजपाचा बालेकिल्ला आहे असे सिद्ध करा.

जिल्हा परीषदेची सत्ता एक हाती घेण्यासाठी युती करा – खडसे
विधान परीषद व जिल्हा परीषदे ह्याची निवडूक एकत्रीतपणे होत आहे हा योग आहे, आता एक एक मत महत्वाचे आहे, अशी माहीती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. पुढे बोलतांना सांगितले की, मधल्या काळात पदवीधर संघाचे पद आपल्याकडे नव्हते म्हणून आपल्याला मिळणार नाही असे समजू नका, कारण सर्वांनी एकत्र येवून काम करा, मी विरोधी पक्षनेता असतांना आणि सत्ताधारी असतांना गेल्या 20 वर्षापासून जिल्हा परीषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच राहिला आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परीषदेचा अध्यक्ष हा भाजपाचाच राहिला पाहिजे. जिल्हा परीषद व पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेना सोबत युती करायला काही हरकत नाही. यावर ना. महाजन यांनी विचार करावी असे यावेळी सांगितले. त्यामुळे 69 जागांपैकी 60 जागा आपल्या पदरात पडतील आणी सत्ता एक हाती येईल. आता कार्यकर्त्यांनी एकत्र येवून काम करावे निवडणूकीच्या काळात ना. महाजन यांनी पाचोरेकरांशी मैत्री कमी करावी, असाही टोला यावेळी दिला. विरोधी पक्ष असतांना बेठोकपणे बोलता येत होते मात्र सत्तेत आल्यावर विचार करून बोलावे लागते. हवेतर राहून उपयोग नाही. तसेच हॅट्रीकल, टिश्यूकल्चर प्रकल्प रद्द करण्यात आला, कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव अजूनही पडून आहे, अभियांत्रिकी (अल्पसंख्यांकसाठी) महाविद्यालय रद्द झाले. हे कामे लवकरात लवकर मार्गी लावावे अशी विनंती पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना. पाटील यांना केली.

सोन्यासारखे नेते अन् हिर्‍यासारखे कार्यकर्ते – जिल्हाध्यक्ष
बैठकीच्या सुरूवातीस ग्रामीण भागाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. यावेळी तालुक्यातील प्रत्येक आमदार व खासदार यांच्या पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणूकीत तालुक्यातील जाबाबदार्‍या वाटून देण्यात आल्या आहेत. येणार्‍या काळात कार्यकर्त्यांच्या घौडदौडवर पक्षाचे यश ठिकुन आहे. जळगाव जिल्ह्याला सोन्यासारखे नेत व हिर्‍या सारखे कार्यकर्ते असले म्हणजे विजय निश्‍चीत असल्याचे जिल्हाध्यक्ष वाघ यांनी सांगितले. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 34 हजार 823 पदवीधरांची नोंदणी झाली त्यापैकी 16 हजार 663 पदवीधरांची नोंदणी पक्षाने केली असल्याचेही यावेळी श्री. वाघ यांनी सांगितले.