भुसावळ- जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या वाहनाला नशिराबादजवळ डंपर चालकाने धडक दिली मात्र चालकाने प्रसंगावधाने दाखवल्याने जि.प.अध्यक्षा बचावल्या. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. अंजाळे येथून पाटील या माजी उपाध्यक्षांसह खाजगी स्वीय सहाय्यक गणेश पाटील यांच्या समवेत जळगावकडे परतत असताना एका डंपरने वाहनाला धडक दिली. नशीब बलवत्तर असल्याने सर्व जण सुखरूप बचावले. दरम्यान, डंपरच्या धडकेत जि.प.अध्यक्षांच्या वाहनाच्या टेल लाईटचे नुकसान झाले असून अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. या प्रकरणी अज्ञात वाहनाच्या डापर चालकाविरुद्ध नशिराबाद पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.