भुसावळ: 19 वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याप्रकरणी जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 17 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पीडीत तरुणी कोळंबे हॉस्पीटल तर अष्टभूजा मंदिरादरम्यान जात असताना आरोपी पाटील यांनी ट्यूशनची बॅग ओढत विनयभंग केल्याचा आरोप आहे. जिल्हा परीषद सदस्याविरुद्धच गुन्हा दाखल झाल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. तपास उपनिरीक्षक अंनिस शेख करीत आहेत.
राजकीय दबावापोटी गुन्हा -रवींद्र पाटील
राजकीय दबावाला बळी पडून आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. आपल्याला शिवीगाळ करणार्याविरुद्ध आपण तालुका पोलिसात तक्रार दिल्याने आपल्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले, असे जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी सांगितले.