माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची माहिती ; बदलीची मागणीही करणार
भुसावळ- राजकीय वा आर्थिक दबावामुळे संशयीत आरोपीला मदत करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अंजली दमानिया प्रकरणाचा तपास निरीक्षकांकडून काढून दुय्यम अधिकार्यांकडे दिला त्यामुळे या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत शिवाय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपासात हस्तक्षेप केल्याने त्यांच्या बदलीची मागणीही आपण करणार आहोत. या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असून जो पर्यंत या प्रकरणाचा तपास होत नाही तोपर्यंत तपास अधिकार्याची बदली करू नये, अशीदेखील आपली मागणी असणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. एखाद्या प्रकरणात संशयीत आरोपीने सांगितल्यानंतर तपास अधिकारी बदलण्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना असल्याचेही खडसे म्हणाले.