जिल्हा बँकेकडून 1 लाख सदस्य शेतकर्‍यांना कर्जमाफी

0

पुणे । पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 99 हजार 800 सभासद शेतकर्‍यांना 311.73 कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांची माहिती मिळवण्याचे काम प्रशासना करत आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाला छत्रपत्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करणे भाग पडले. मात्र, ऑनलाईन प्रणालीच्या गोंधळामुळे कर्जमाफी योजना राबविण्यात अनेक अडचणी आल्या.

दौंड तालुक्यात सर्वाधिक लाभीर्थी
पुणे जिल्हा बँकेच्या शेतकर्‍यांसाठी 311.73 कोटी रक्कम प्राप्त झाली. या रक्कमेपैकी थकबाकीदार शेतकर्‍यांना 207 कोटी रुपये आणि वेळेवर कर्ज परत करणार्‍या सभासद शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभासाठीची 104.25 कोटी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 38 हजार 915 थकबाकीदार शेतकर्‍यांना 209.47 कोटी व 60. 885 शेतकर्‍यांना वर्ग करण्यात आलेली आहे. या व्यतीरिक्त पुनर्गठन केलेल्या 1 हजार 31 शेतकरी सभासदांना 4 कोटी 21 कोटी इतक्या रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सर्वाधिक 8 हजार 544 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर वेल्हा तालुक्यातील केवळ 710 शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली आहे.