जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थेट बचत खात्यात पैसे उपलब्ध करून द्यावे

0

शिंदखेडा:शेतकऱ्यांना विविध सोसायटीमार्फत जिल्हा बँकेतर्फे एटीएमद्वारे पीककर्ज दिले जात आहे.मात्र, बहुतांश एटीएम बंद असल्याने शेतकऱ्यांना पैसे काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थेट बचत खात्यात पैसे उपलब्ध करून द्यावेत. बँकतर्फे यावर्षीही खरिपासाठी एप्रिलपासून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दिले गेले आहे. सोसायटीच्या मागणीनुसार बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करुन दिले आहे. बँकेच्या नियमानुसार हे कर्ज शेतकऱ्यांना फक्त त्यांना दिल्या गेलेल्या जिल्हा बँकेच्या एटीएमद्वारेच काढता येते.सर्वत्र ठिकाणी एटीएम बंद आहेत.एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी मोठी अडचण येत आहे. बँकेने कर्ज रक्कम एटीएमद्वारे न देता थेट त्यांच्या बचत खात्यामार्फत उपलब्ध करून द्यावी. मात्र, बँकेत जास्त गर्दी होऊ नये,शेतकऱ्यांना कोणत्याही वेळी पैसे काढता यावेत म्हणून ही सुविधा देण्यात यावी, अशीही मागणी नमूद आहे.

वाडी शेवाडी पाटचारी दुरूस्त करा

वाडी शेवाडी पाटचारी दुरूस्त करण्यात यावी. त्यामुळे अनेक गावाच्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळू शकते. कोरोनामुळे संपूर्ण देशात २४ मार्च ते ३१ मे पर्यंत लॉकडाऊनच आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे दुसरा कुठलाही उपाय कर्जफेडीसाठी नाही. तसेच पिक कर्ज माफी योजने अंतर्गत जे शेतकरी कर्ज माफीस पात्र झाले आहेत. त्यांचे पैसे शासनाकडून बँकेत न आल्यामुळे ते शेतकरी सुद्धा थकबाकीदार म्हणूनच घोषित होत आहेत. म्हणूनच त्यां शेतकऱ्यांना थकबाकीदार घोषित न करता पुढील वर्षाच्या कर्ज योजनेअंतर्गत त्यांना कर्ज पात्र करणेसाठी घोषित करण्यात यावे. आरबीआयच्या नियमानुसार ३१ मार्चपर्यंत जर शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर तो थकीत होतो व पुढील वर्षाचे कर्ज मिळण्यास अपात्र होऊन तो वंचित राहील. म्हणून आरबीआयने ३१ मे पर्यंतची दिलेली मुदतवाढ वाढवून मिळावी व पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यासही कर्ज उपलब्ध करण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन देवून अशी मागणी माजी नगरसेवक सुरज देसले यांनी नायब तहसीलदार भिमराव बोरसे यांच्यासह प्रशासनाकडे केली आहे.