जिल्हा वकील संघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट

0

जळगाव : जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत आज माघारीचा शेवटचा दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदासाठी दोन अर्जांपैकी कुणीही माघार न घेतल्याने दोन उमदेवार रिंगणात आहे. शेवटच्या दिवशी सचिवपदासाठी अ‍ॅड. ऋषीराव सोनवणे यांनी माघार घेतली. त्यामुळे सचिवपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर महिला वकिल सदस्यांसाठी दोन जागा राखीव असून त्यात अ‍ॅड.लिना म्हस्के, अ‍ॅड.प्रतिभा पाटील यांचे अर्ज असल्याने या दोघांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. आता अध्यक्ष पदासाठी दोन तर सचिवपदासाठी तीन, सहसचिवपदासाठी तीन तर कार्यकारिणी पुरुष सदस्यांमधून 8 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहे. निवडणुकीसाठी 19 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, अध्यक्षपदासाठी अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी विरूध्द अ‍ॅड.दिपकराज खडके यांच्यात लढत आहे. तर सचिवपदासाठी अ‍ॅड. महेश भोकरीकर, अ‍ॅड. योगेश गावंडे, अ‍ॅड. बाळू साळी यांच्यात तिरंगी तर सहसचिव पदासाठी अ‍ॅड. रविता देवराज, अ‍ॅड. प्रतिभा मनोहर पाटील, अ‍ॅड. छाया सपके यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. मंजू वाणी यांचा एकमेव अर्ज होता. कोषाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. जयेश भावसार यांचाही एकमेव अर्ज होता आज माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. आर. एन. पाटील यांनी निवड घोषित केली.