जिल्हा स्तरावरील कॅरम स्पर्धेत मिल्लतचे वर्चस्व कायम

0

जळगाव। मनपा अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकत्याच झालेल्या 14, 17, आणि 19 वायोगातील मुलांच्या जिल्हा स्तरावरील कॅरम स्पर्धेत मिल्लाय हायस्कूल,मेहरूण,जळगाव येथील अम्मार आदिल खान(आंतर 14), शेख दानिश नदीम, नुमान आदिल खान ,मुहम्मद उझेब आसिफ मण्यार, शेख मुजफ्फर रज्जाक,(आंतर 17), शेख जाहिद रफिक, शेख मुजाहिद रज्जाक (आंतर 19) या खेळाडूंनी जिल्हास्तरावर विजयश्री प्राप्त करीत विभागीय स्तरासाठी निवडण्यात आले.

संस्था पदाधिकार्‍यांनी केले खेळाडूंचे कौतुक
स्पर्धेत मिल्लतचे खेळाडूंनी मागील तीन वर्षांच्या आपल्या चांगल्या कामगिरीचे वर्चस्व कायम राखण्यातही यश मिळविले.खेळाडूंना शाळेचे क्रीडाप्रमुख शेख ताजोद्दिन, क्रीडाशिक्षक सैयद मुख्तार यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल मिल्लतचे अध्यक्ष मुहम्मद जाहिद देशमुख, उपाध्यक्ष मुहम्मद रफिक शाह, मुख्य्ध्यापक शेख मुश्ताक़ अहेमद, पर्यवेक्षक अब्दुल कय्युम शाह, व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कार्चारी यांनी अभिनंदन केले आहे.