जळगाव । शासनाच्या महसुल व वनविभागाच्या ठराव आणि तरतूदीनुसार जळगाव जिल्ह्याची खरीप पिकांची सन 2017-18 ची अंतिम पैसेवारी आज जाहिर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील आठ तालुके 50 पैश्याचे आत तर उर्वरित तालुके 50 पैश्याचे वर असल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यात एकुण 1502 गावांची संख्या असून त्यातील 814 गावे हे 50 पैश्याच्या आतील आणीवारीत जाहीर करण्यात आले तर 688 गावे 50 पैश्यापेक्षा जास्त जाहीर करण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
तालुकानिहाय आणेवारी याप्रमाणे
50 पैश्यांपेक्षा कमी – जामनेर -152, पारोळा -48, बोदवड -51, मुक्ताईनगर -81, पाचोरा -129, भडगाव -63, अमळनेर -154, चाळीसगाव -136 असे एकुण 814 गावांचा समावेश आहे.
50 पैश्यांहून अधिक – जळगाव – 92, एरंडोल- 65, धरणगाव-89, पारोळा- 66, भुसावळ – 54, यावल – 84, रावेर -121, चोपडा- 117 असे एकुण 688 गांवाचा समावेश आहे.