जिल्ह्यातील अवैध बंद करण्यासाठी गृह राज्यमंत्री येणार

0

नंदुरबार । गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाला तिलांजली देत नंदुरबार पोलिसांच्या मुकसंमतीने शहरात पुन्हा अवैध धंदे सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा प्रश्‍न विधान परिषदेत नुकताच गाजला आहे.यावर लक्षवेधी झाल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच गळचेपी झाली होती. त्यामुळे थातुरमातुर कारवाई करून अवैध धंदे तात्पुरते बंद करण्याचे फर्मान पोलिसांनी काढले होत. या गोष्टीला एक आठवडा उलटत नाही तोच शहरासह जिल्हा भरात अवैध धंदे पुन्हा फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा प्रकारचे धंदे बंद करण्यासाठी स्वतः गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे नंदुरबारला येऊन विशेष पोलीस महानिरीक्षकांसोबत बैठक घेणार आहेत. दुसरीकडे मात्र पोलिसांच्या नाकावर टीच्चुन शहरात अवैध धंदे पुन्हा सुरू झाले आहे.