जिल्ह्यातील एकही कारखाना अनुदान यादीत नाही

0

पुणे । केंद्राने साखरेचे निर्यात धोरण जाहीर केले असून राज्य सरकारने देखील निर्यातीसाठी अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाने अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात 28 कारखान्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील यादीत पुणे जिल्ह्यातील एकाही कारखान्याचा समावेश झालेला नाही.

739 लाख मे. टन उत्पादन
यंदाचा साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आणि साखर निर्यातीसाठी आवश्यक असणारी अनुदानित रक्कम रखडलेल्यामुळे साखरेचे उत्पादन होऊन सुद्धा कारखान्यांना निर्यात करण्यात अडचणी येत होत्या.गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने उत्पादन चांगले झाले आहे.त्याचा परिणाम साखर निर्मितीवर झाला आहे.आत्तापर्यत सुमारे 739 लाख मेट्रीक टन विक्रमी उत्पादन आहे.

एफआरपीची सर्व रक्कम शेतकर्‍यांना देणे गरजेचे
पहिल्या टप्यात राज्यातील 28 कारखान्याचा समावेश असून त्या कारखान्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे. या कारखान्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील एकाही कारखान्यांचा समावेश नाही.कोल्हापूर,सातारा,सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे. अनुदान स्विकारण्यापुर्वी साखर कारखान्यांनी एफआरपीची सर्व रक्कम शेतकर्‍यांना देणे गरजेचे आहे.एफआरपीचे देणे शिल्लक असलेल्या कारखान्यांना अनुदान मिळणार नाही.