जिल्ह्यातील नेमबाजांची महाराष्ट्र संघात निवड

0

जळगाव : तिरूअनंतपुरम(केरळ) येथे दि.11 ते 31 पर्यंत होणार्‍या 61 वी राष्ट्रीय नेमबाजी शुटींग चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात जिल्हा रायफल असो.च्या 7 नेमबाज खेळाडूंची निवड झाली आहे.या स्पर्धेत भारतीय सैन्याचे तिन्ही दलाचे संघ तसेच सर्व निमलष्करी दले व देशातील सर्व राज्यांचे संघ आपआपल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह या स्पर्धेत सहभागी होतील. जिल्हा संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून पोलिस विभागातील विशेष सुरेक्षा विभागामधील पो.कॉ.प्रकाश दिलीप गवळी तर संघ प्रमुखपदी जळगाव वनविभागातील आंतरराष्ट्रीय खेळाडू गणेश गवळी व उपसंघ प्रमुखपदी राष्ट्रीय खेळाडू निलेश जगताप यांची जिल्हा असो.चे अध्यक्ष बिशन मिलवाणी यांनी निवड जाहीर केली आहे.

स्पर्धेत पीपसाईट एअर रायफल 10 मिटर प्रकारात गणेश गवळी, जळगाव वनविभाग, निलेश जगताप, कृष्णा भाटीया, पियुष सपकाळे, देवेंद्र चोपडे व एअर पिस्तोल 10 मिटर प्रकारात पो.कॉ.प्रकाश गवळी, हरिष साळुंखे या खेळाडूंचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे असो.चे अध्यक्ष विशाल मिलवाणी, सचिव दिलीप गवळी, प्रा.यशवंत सैंदाणे, प्रा.विनोद कोचुरे, विलास जुनागडे, सुनिल पालवे, अशोक शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.