धुळे । जिल्ह्यातील 14 शेतकर्यांचा कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शनिवारी कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सपत्नीक गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते अध्यक्षस्थानी होते. तर मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजरुन गुंडे, अधिकारी तुषार माळी, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती लीलावती बेडसे, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, शिक्षण व आरोग्य सभापती नूतन निकुंभ, महिला व बालकल्याण सभापती वंदना गुजर, पं.स. सभापती अनिता पाटील, दिनेश भदाणे, कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, डॉ.बी.एन. पाटील, बी.के. वारघडे आदी उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यांना केले सन्मानित
यावेळी इंदिरा साळुंखे, मुकटी, संजय गवळे, नेर, चिंधा पाटील, नगाव, रामकृष्ण पाटील, वडजाई, राजेंद्र भामरे, वार, ता.धुळे, विजय बागुल, शेवगे, मोन्या मावची, चरणमाळ, राजेंद्र अहिरे, खट्याळ, किशोर देवरे, म्हसदी, नितीन ठाकरे, काळगाव, ता.साक्री, देवीदास पाटील, वर्शी, धनराज माळी, रामी, ता.शिंदखेडा आणि सुभाष पावरा, वकवाड व जनार्दन पाटील, भाटपुरा, ता.शिरपूर या शेतकर्यांचा प्रशस्तिपत्र, शाल, श्रीफळ व छत्री देऊन सत्कार करण्यात आला.
रोपे आपल्या दारी
वाघाडी । शिरपुर येथील सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक संदिप शिरसाठ यांच्या हस्ते वनमहोत्सव केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यालयातील वनक्षेत्रपाल एम.एच.महाजन शिरपुर, बी.बी.पाटील वनक्षेत्रपाल बोराडी (प्रा.), डी.एम.शरमाळे वनक्षेत्रपाल सांगवी (प्रा.), एन.एन.वाघ वनपाल शिरपुर, ए.एन.बागुल, पी.ए.आंबोरे वनरक्षक एस.पी.जाधव ,होमगार्ड्स तालुका समादेशक अधिकारी सुभाष लोहार आदी उपस्थित होते.