जळगाव – जळगाव जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक व एक उर्दू शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला जातो. त्यानुसार मंगळवारी १६ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारासाठी जिल्ह्यातून गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत २३ प्रस्ताव जि.प.कडे आले होते. या प्रस्तावानुसार आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने २९ रोजी विद्यानिकेतन शाळेत मुलाखती घेतल्या होत्या. तसेच कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती. शिक्षण समितीचे सभापती पोपटतात्या भोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिंवाजी दिवेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर शिक्षकांची यादी मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या १६ शिक्षकांच्या यादीस मान्यता देऊन आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहे. आज ५ रोजी शिक्षक दिन असला तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण लवकरच केले जाईल असे सभापती पोपटतात्या भोळे यांनी सांगितले.
पुरस्कार जाहीर झालेले शिक्षक
* अमळनेर तालुक्यातील शिरूड शाळेचे चंद्रकांत भिला पाटील,
* भडगाव तालुक्यातील जुवार्डी जि.प.शाळेचे संजय रतन पाटील,
* भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बु.शाळेचे श्रीकृष्ण प्रल्हाद पाटील,
* बोदवड तालुक्यातील जामठी शाळेचे सुनील बाबूराव माळी,
* चोपडा तालुक्यातील हातेड शाळेचे मच्छिंद्र रमेश कोळी,
* चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे शाळेचे शालीग्राम शिवाजी निकम,
* धरणगाव तालुक्यातील निंभोरे शाळेचे प्रमोद सुकदेव पाटील,
* एरंडोल तालुक्यातील कढोली शाळेच्या अलका आनंद पाटील,
* जळगाव तालुक्यातील मोहाडी शाळेचे गणेश मोहन बागुल,
* जामनेर तालुक्यातून लहासर शाळेचे प्रविण रामा कुऱ्हाडे,
* पारोळा तालुक्यातून देवगाव शाळेचे दीपक भिवसन पाटील,
* पाचोरा तालुक्यातुन वडगावकडे शाळेचे राजेंद्र बबन राठोड,
* मुक्ताईनगर तालुक्यातून मुक्ताईनगर शाळेचे भीमराव शालीग्राम पवार,
* रावेर तालुक्यातून जुनोने शाळेचे प्रमोद दत्तू पाटील,
* यावल तालुक्यातून पाडळसे शाळेच्या सीमा ज्ञानदेव जावळे यांना पुरस्कार जाहीर झाले तर
* उर्दू शाळेतून उत्तेजनार्थ पुरस्कार जळगाव तालुक्यातील नशिराबाद शाळेचे खुदेजा बी शेख युसुफ यांना जाहिर झाला आहे.