जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणूक निकाल जाहीर

0

जळगाव/चाळीसगाव। पंचायत समिती निवडणुकीत निवडुण गेल्याने, मयत झाल्याने किंवा विविध कारणाने अपात्र झालेल्या ग्रामपंचायतच्या जागांसाठी जळगाव जिल्ह्यात पोटनिवडणुक घेण्यात आली. जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. शनिवारी 27 रोजी या जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. सोमवारी 29 रोजी निवडणुकीचा निकाल घोषीत करण्यात आला.

चाळीसगाव तालुक्यात 3 जागांसाठी
तालुक्यातील रांजणगाव, चांभार्डी खुर्द, टाकळी प्र.दे येथील 3 जागेकरीता निवडणुक घेण्यात आली तर हिरापूर ग्रामपंचायत येथील 1 जागा बिनविरोध करण्यात आली. चांभार्डी खुर्द येथील प्रभाग क्रमांक 3 मधील 1 सदस्य मयत झाल्याने त्यांच्या जागेवर सखुबाई पांडुरंग खैरे 91 मते मिळवून त्या विजयी झाल्या आहेत. रांजणगाव येथे जमीर शेख यांना 358 मते मिळून विजयी झाल्या आहेत. टाळकी प्रदे येथील नूतन कैलास पवार यांना 249 मते मिळवून एका मताने, हिरापूर ग्रामपंचायत सदस्यपदी मनोज विजय पाटील बिनविरोध निवडुण आले आहे.

जळगाव तालुक्यात 9 जागांसाठी
तालुक्यातील देऊळवाडे, रायपूर, कानळदा, आव्हाणे, अकुलखेडा या गावातील ग्रामपंचायतच्या 9 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूका घेण्यात आल्या. यात देऊळवाडे प्रभाग क्रमांक 1 मधुन दिपक सोनवणे, शालु पाटील, प्रभाग क्रमांक 2 मधून बेबीबाई सपकाळे, दिलीप कोळी (बिनविरोध), रायपुर प्रभाग क्रमांक 1 मधून प्रविण परदेशी, कानळदा प्रभाग क्रमांक 4 मधून आशा राणे, प्रभाग क्रमांक 5 मधून प्रविण सपकाळे, आव्हाने प्रभाग क्रमांक 1 मधून सुरेश पाटील, शेळगाव सोपान कोळी, शेळगाव सोपान कोळी (बिनविरोध), फुपणी साधना पाटील (बिनविरोध) निवडुण आले आहेत.

या ठिकाणी निवडणूक
चोपडा तालुक्यातील अकुलखेडा, पाचोरा तालुक्यातील वाणेगाव, यावल तालुक्यातील हिंगोणा, मनवेल, जामनेर तालुक्यातील लिहे तांडा, पहुरपेठ, हिवरखेडा बु., मुक्ताईनगर तालुक्यातील कोर्‍हाळे, चाळीसगाव तालुक्यातील साखळी, चांभार्डी खुर्द, रांजणगाव, धरणगाव तालुक्यातील बांभोरी, भुसावळ तालुक्यातील खडके, गोजोरे,चोरवड, या 18 ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक घेण्यात आली. यावेळी स्थानिक पोलिसांची उपस्थिती होती.