जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने आज नाशिक विभागाचा महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते जिल्ह्यातील गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील 25 अधिकारी तसेच कर्मचार्यांचा समावेश असून त्यांचाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नाशिक विभागातील 3 हजार अधिकारी उपस्थित
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन महसूल दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी नागपूर येथून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक येथून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, मालेगाव येथून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागीय आयुक्त राजाराम माने, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सर्वश्री सुरज मांढरे, संजय यादव, अभिजीत राऊत, राहुल द्विवेदी, डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे यांचेसह विभागातील सर्व जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी यांचेसह सर्व कर्मचारी आदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार सर्व मंत्री महोदयांनी महसूल विभागाला कौतुकाची थाप दिली आहे.
अधिकार्यांसह 25 कर्मचार्यांचा सत्कार
उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलबळे (जळगाव), उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबाले (फैजपूर), तहसीलदार अमोल मोरे चाळीसगाव, नायब तहसीलदार रविंद्र मोरे, जळगाव, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, जळगाव, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड धरणगाव, लघुलेखक, हरिष कोळी अमळनेर, अव्वल कारकुन मिलिंब बुवाव, जळगाव, अव्वल कारकुन योगेश पाटील, जळगाव, अव्वल कारकुन एच.यू.सय्यद, चोपडा, मंडळ अधिकारी जनार्दन दत्तात्रय बंगाळे, यावल, मंडळ अधिकारी योगीता पाटील, भुसावळ, लिपिक टंकलेखक चंद्रकांत कुंभार, जळगाव, लिपिक टंकलेखक, जगदीश ढमाळे, जळगाव, तलाठी निशिकांत पाटील, पारोळा, तलाठी राहूल पवार, भडगाव, वाहन चालक रविंद्र भिका पाटील, पाचोरा, वाहन चालक संदीप पाटील, जळगाव, शिपाई बबीता बिर्हाडे , जळगाव, शिपाई योगेश अडकमोल, जळगाव, शिपाई शेख उस्मान शेख चांद, मुक्ताईनगर, शिपाई समाधान पाटील, बोदवड, कोतलवाल संतोष जगन्नाथ कोळी, , कोतवाल ज्ञानेश्वर पवार, जळगाव यांचा ऑनलाईन सत्कार करण्यात आला.