जिल्ह्यातील 80 टक्के कापुसाची लागवड पूर्ण

0

जळगाव। केरळात 30 मे रोजी मान्सुन दाखल झाले आहे मात्र राज्यात अद्यापही मान्सुनचे आगमन झालेले नाही. पावसाळ्याचे चाहूल लागल्याने शेतकर्‍यांनी शेती लागवडीला सुरुवात केली. राज्यात मान्सुनपुर्व झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 80 टक्के शेतकर्‍यांनी पूर्व हंगामी कापसाची लागवड केली आहे. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक पाऊस गायब झाल्याने लागवड करण्यात आलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे. अगोदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतांना शेतकर्‍यांवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढविले आहे. जिल्ह्याभरात एकुण 4 लाख 68 हजार 800 हेक्टरवर कापूस लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी जवळपास 37 हजार हेक्टरवर पूर्व हंगामी लागवड करण्यात आली आहे. चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल या तालुक्यात सर्वाधिक कापूस लागवड झाली आहे.

खताचा तुटवडा जाणवणार
सध्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खतांचा पुरवठा झालेला आहे. मात्र अद्याप संपुर्ण लागवड झालेली नाही संपुर्ण लागवडीनंतर खतांचा पुरवठा जाणवु शकतो. युरीयाची अधिक मागणी असल्याने या खताचा तुटवडा काहीसा प्रमाणात जाणवेल असा अंदाज जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी वर्तवला आहे. मात्र खतांचा तुटवडा जाणवु नये यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. यावर्षी खत खरेदी करतांना शेतकर्‍यांचा पीओएस मशिनद्वारे आधारकार्ड व अगंठ्याचा ठसाने नोंद होणार असल्याने खत साठवणुकीला आळा बसणार असणार आहे.