धुळे । जिल्ह्यात व्यापार्यांवर होणारे हल्ले, वाढत्या घरफोड्या, अवैध धंदे या विरोधात समाजवादी पार्टीच्या युथ ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. व्यापारी यांच्याकडून खंडणी वसुल करणे, दमदाटी यामुळे गुन्हेगारी, अवैध धंदे विरोधात समाजवादी पार्टीची निदर्शने व्यवसायीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच चैन स्नॅचिंग, चोर्या, घरफोड्या आदी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
या होत्या मागण्या
अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली आहे. पोलिस प्रशासनाने व्यापारी यांना अभय देवून वाढती गुन्हेगारीला आळा घालावा, अशी मागणी जिल्हाधिकारींकडे करण्यात आली आहे. याप्रसंगी गोरख शर्मा, अश्पाक मिर्झा, नवाब खान, इनाम सिद्दीकी, जाकीर खान, गुलाम कुरेशी, सौ. सिमा चव्हाण, रफीक शाह, इम्रान खाटीक, पुजा चव्हाण उपस्थित होते.