जळगाव -जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढु लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात नव्याने 772 रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक 359 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जळगाव 2, भुसावळ 1, चोपडा 1, धरणगाव 1 असा 5 रुग्णांचा रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण 63422 असे रूग्ण आढळुन आले आहे. त्यापैकी 57895 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण 23, भुसावळ 64, अमळनेर 19, चोपडा 108, पाचोरा 2, भडगाव 2, धरणगाव 24, यावल 17, एरंडोल 48, जामनेर 13, रावेर 3, पारोळा 15, चाळीसगाव 51, मुक्ताईनगर 18, बोदवड 6 असे एकुण 772 रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधिताची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे जनतेने प्रशासनाच्या दिलेल्या नियमांचे पालन करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.