जळगाव शहरात सर्वाधिक 328 नविन रूग्ण
जळगाव – जिल्ह्यात सोमवारी पुन्हा कोरोनाने नवा विक्रम केला असून एकाच दिवसात तब्बल 1185 नवे कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक जळगाव शहरातील 328 रूग्णांचा समावेश आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या हि जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब समजली जात आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 33 हजार 618 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 7 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहेत. सोमवारी पुन्हा कोरोनोन एक हजारांचा आकडा पार केला असून जिल्ह्यात 1185 नवीन रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 328 , जळगाव ग्रामीण 82, भुसावळ 55, अमळनेर 82, चोपडा 62, पाचोरा 65, भडगाव 38, धरणगाव 28 , यावल 106, एरंडोल 29, जामनेर 26, रावेर 17, पारोळा 71, चाळीसगाव 95, मुक्ताईनगर 71, बोदवड 13, इतर जिल्ह्यातील 17 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 7 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भडगाव, मुक्ताईनर तालुक्यात प्रत्येकी 2 तर जळगाव शहर, जामनेर, एरंडोल तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.