जळगाव। शहरासह जिल्ह्यात सर्पदंश होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासोबतच संर्पदंशावर लागणार्या औषधीही प्राथमिक उपकेंद्रांवर उपलब्ध नसल्याने रूग्णांना अखेर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ पाठविले जाते. दरम्यान, गुरूवारी जिल्ह्यात चार जणांना सर्पदंश झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांना सापाने दंश केले. चौघांनी प्रकृति खालावल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सर्पदंश झालेल्यांमध्ये कल्पना संजय धनगर (रा. ताडे ता. एरंडोल), भिकन त्र्यंबक पाटील (वय-35 रा. टाकळी ता. धरणगाव), नबु किसन भिल (वय-40 रा. म्हसावद), पंडीत तुकाराम गवळे (वय-56 रा. रायपुर कंडारी) अशांचा समावेश आहे.