नवापूर। येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूल व एच. जे. शाह कनिष्ठ महाविद्यालयात विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्राचार्य संजयकुमार जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक नीलिमा मावची या विद्यार्थिनीने आदिवासी भाषेत केले. याहमोगी माता, बिरसा मुंडा, खाज्या नाईक यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीनी आदिवासी पेहराव करून नृत्य सादर केले. तसेच लक्ष्मी मावची, अंकिता गावित, सरला गावित, नीलिमा मावची यांनी आदिवासी गीत सादर केले. पर्यवेक्षक धनसुकभाई चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनीही आदिवासी भाषेत मुलांशी संवाद साधला व आदिवासी समाजाचा इतिहास मनोगतातन सांगितला.
स्वातंत्र्य मिळविण्यात आदिवासी वीरांचे योगदान
प्राचार्य संजयकुमार जाधव यांनी ही आदिवासी भाषेतूनच आपल्या अध्यक्षीय मनोगताची सुरवात केली ते म्हणाले की आपण सर्व आदिवासी बहुल भागात राहत असून त्या समाजाची रूढी परंपरा आपणास ठाऊक आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक आदिवासी वीरांनी बलिदान दिल्याची इतिहासात नोंद आहे. कोणताही कार्यक्रम असो त्यात आदिवासी विद्यार्थी आपल्या कालागुणांची चुणूक दाखवतात. ती आजही आपल्याला त्यांच्या नृत्यातून पाहवयास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात प्राचार्य संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापक छोटा सर, उपप्राचार्य आसिफ शेख, पर्यवेक्षक चौधरी, जेष्ठ शिक्षक प्रा सुभाष निल, प्रा कमल शाह, मर्चंट सर, फारूक पटेल, किशोर सैंदाने, जमीला मॅडम शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. आभार अंकिता गावित या विद्यार्थिनीने तर सूत्रसंचालन प्रा गणेश लोहार व गुफारण मणियार यांनी केले
विद्यार्थींनींचे आदिवासी नृत्य
येथील श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात विश्व आदिवासी गौरव दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपमुख्याध्यापक विनोद पाटील ,उपप्राचार्य एस आर पहुरकर ,पर्यवेक्षक प्रविण पाटील,भरत पाटील, कमल कोकणी उपस्थित होते. विद्यार्था व शिक्षकांनी आदिवासी दिनाचा घोषणा देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी गीत गायन,नृत्य स्पर्धा घेण्यात येऊन गुणवतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा भटु चौरे यांनी आदिवासी दिनाबद्दल सविस्तर व मौलीक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन सावित्री पाडवी यांनी तर आभार प्रा मनोज पवार यांनी मानले. यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधु भगिनींनी आदिवासी दिनानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत सहभाग नोंदवला. विद्यार्थीनींनी आपला पारंपरीक आदिवासी परिधान केला होता. आदिवासी नृत्य,पेहराव यातुन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवुन आले.
करंजी विद्यालय येथे विश्व आदिवासी दिन साजरा
नवापूर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंजी बुद्रुक येथे विश्व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय गावीत, प्रमुख पाहुणे म्हणून पाण्या गावीत, मुख्याध्यापक सुरेश घरटे, प्रकाश मुंजे, सुमन गावीत, असीम गावीत होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांना आदिवासी पोषाख घालून आदिवासी समाज दर्शन घडविण्यात आले. क्रांतिवीर मुंडा यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य, शिबली नृत्य, पावरा नृत्य, आदिवासी गीते, सादर केलीत. यात प्रामुख्याने सुनीता गावीत, एंजल् गावीत, प्रिती गावीत, लता पावरा, उर्मिला पावरा, रंजना पावरा, अर्चना गावीत, स्मिता गावीत, महिमा गावीत, अंकिता गावीत आदी विद्यार्थिनींनी अत्यंत जल्लोषात नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच शिरीष गावीत, नीलिमा गावीत, महिमा गावीत यांनी मनोगत व्यक्त केले. महेश पुरक यांनी आमी आदिवासी हे आदिवासी गीत सादर केले. सुमन गावीत यांनी क्रांतिवीर विषयी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सुरेश घरटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजधर जाधव, सूत्रसंचालन रणजितसिंह गिरासे तर आभार मनोज पगारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेंद्रसिंह शिसोदे, संजय बागूल, प्रशांत सावंत, महेश पूरकर, मनीषा वसावे, दिपाली खैरनार, मनोज पगारे व सहकार्यांनी कामकाज पाहिले.