जळगाव – जिल्ह्यात तब्बल 138 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 720 झाली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरातील 39 असे एकूण शहराचा कोरोनाबाधीतांचा एकूण आकडा 782 वर जावून पोहचला आहे. दरम्यान बुधवारी 6 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज तब्बल 138 रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर 39, जळगाव ग्रामीण 6, एरंडोल 3 , जामनेर 3, रावेर 10; अमळनेर-7; भुसावळ-13; चोपडा-11; पाचोरा-1; भडगाव-5; धरणगाव-1; मुक्ताईनगर 1, यावल 13 ,चाळीसगाव 1 ; पारोळा-5, बोदवड-19; असे रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून अमळनेर व धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी 2, मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा सहा कोरोनाबाधीतांचा बुधवारी मृत्यू झाला आहे.