फरार, हद्दपार, टॉप टेन गुन्हेगार यांचा समोवश
कर्मचारी रात्रभर रस्त्यावर उतरले
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हाभरात ऑल आऊट मोहिमेतंर्गत कोम्बीग ऑपरेशन राबविले. यात फरार व वारंटातील ३०० च्यावर आरोपींना पकडण्यात आले. यादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडतीही घेण्यात आली. शहरातील तांबापुरा, सुप्रीम कॉलनी, मेहरुण, राम नगर, रामेश्वर कॉलनी, कंजरवाडा, शनी पेठ यासह विविध भागांमध्ये कोम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी तसेच कर्मचार्यांचा ताफा रात्री ११ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत रस्त्यावर होता.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्री ११ ते सकाळी ५ वाजेदरम्यान कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. यात फरार, हिस्ट्रीशिटर, हद्दपार, नॉन बेलेबल वॉरंट, प्रोव्हीबिशन,आर्म अॅक्ट, मुंबई पोलीस कायदा अशा आरोपींचा समावेश आहे. यादरमयान ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह केसेस, विना सिटबेल्ट वाहन चालविणे, विना हेल्मेट, विना परवाना, बेदरकारपणे वाहन चालविणे यांच्यावरही कारवाई करण्यात येवून दंड वसूल करण्यात आला.
शनिपेठ पोलिसांना मिळाले दोन हद्दपार आरोपी
सोन्या उर्फ प्रविण ज्ञानेश्वर सोनवणे वय ३१ रा.प्रशांत चौक, कांचनगर व शंकर पुंडलिक ठाकरे वय ३५ रा. कोळीपेठ हे दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार असतानाही शहरात मिळून आले. कोब्मिंग ऑपरेशनमध्ये शनिपेठ पोलिसांनी त्यांना त्याच्या घरुन ताब्यात घेत शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे,पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, खेमराज परदेशी,पोलीस हवालदार दिनेशसिंग पाटील, गजानन बडगुजर, योगेश बोरसे, हकीम शेख यांनी ही कारवाई केली.
चोरीच्या प्रयत्नातील संशयित ताब्यात
यावेळी मेहरुण भागात कोंबडी फार्मच्या जवळ चोरी करण्याच्या उद्देशाने रमजान कलीम पटेल रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी मिळून आला. तर अयोध्यानगर येथे धारदारा सुरा घेवून आरडाओरड करणार्या आसिफ जुम्मा पिंजारी वय ३४ रा.पिंजारी वाडा, मेहरुण यालाही अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे एमआयडीसी परिसरात भुरट्या चोरट्या करताना आरी शेख खैरुद्दीन रा. उर्दू शाळेजवळ नशिराबाद व शोएब शेख अजीज रा.इस्लामपुरा, नशिराबाद यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी पोलिसांनी नष्ट केली ८० हजाराची गावठी
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत कोब्मिंग ऑपरेशनमध्ये अजामीनपात्र वॉरंटमध्ये १० आरोपी, वारंट रद्द केलेले ५ संशयित यांना अटक करण्यात आली. कंजरावाडा परिसरात ८० हजार रुपयांची गावठी दारुही नष्ट करण्यात आली. पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ, पोलीस उपनिरिक्षक राजकुमार ससाणे, पोलीस उपनिरिक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, नितीन पाटील, भास्कर ठाकरे, पो.कॉ.सचिन पाटील, हेमंत कळसकर, असीम तडवी यांनी कारवाई केली.
अशी आहे जिल्ह्याची स्थिती
हिंस्ट्रीशीटर : २५४,
टॉपटेप गुन्हेगार : १८३
एनबीडब्लु वारंटचे गुन्हेगार : २८६ ,
गुन्हेगार तपासले : ६१७
पकडलेले गुन्हेगार : २७५