जळगाव । भारत स्टेज थ्री इंजिन असलेल्या गाड्यांवर बंपर डिस्काऊंटचा 31 मार्च रोजी शेवटचा दिवस होता. त्यामुळे शहरातील शोरूम मध्ये मध्ये मोठी गर्दी दिसून आली. वाहने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी धावपळ उडाली होती. दुचाकी तसेच चारचाकी वाहनामध्ये सूट मिळत असल्याने नागरिकांची झूड कडकडत्या उन्हात शोरूम बाहेर वाढत होती. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद पाहता अबेक शोरूम मध्ये जाहीर केलेल्या किमतीच्या अधिक पटीने वाढ करून वाहने विकल्याचे माहिती समोर आली आहे. यामुळे ग्राहकांना जळगाव जिल्ह्यात वाहने खरेदी करणार्याची मोठी निराशा झाली आहे. गाड्या ‘आऊट ऑफ स्टॉक’ असल्यानं ग्राहकांना निराश होऊन परतावे लागले आहे. पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने महत्वाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले या निर्णयामुळे बीएस 3 चे बनविलेल्या इंजिन असलेल्या वाहनावर बंदी केल्यानंतर डिस्काऊंट देण्यात आला होता.
भारत-4 इंजिन असलेल्या गाड्यांचीच विक्री
भारत स्टेज थ्री या इंजिनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं भारत स्टेज थ्री इंजिन असलेल्या गाड्यांवर बंदी न्यालयाच्या आदेशानुसार पर्यावरणाच्या दृष्टीने घातली होत. यामुळे होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली आहे. यामध्ये ड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर – 12 हजार 500 रु. सूट, डिलस्क सिरीज -5 हजार रुपये सूट, स्प्लेंडर प्लस -5 हजार सूट , ग्लॅमर, एक्स्प्रो, आयस्मार्ट 100 -7 हजार 500 सूट या वाहनावर अधिक सूट देण्यात आली होती. तर मोटारसायकलवर तब्बल 18 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट दिले होते. वाहने खरेदी केल्या नंतर त्याच दिवशी त्याची नोंद झाली पाहिजे. अन्यथा त्याची नोंद होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी जिल्यातील नागरिकांनी शहरातल्या शोरूम मध्ये गर्दी केली होती. सर्वाधिक वाहने विक्री 2 दिवसांमध्ये झाली आहे. यामध्ये शाईन, ड्रीम, ऍक्टिव्हा 125, डिओ, टी.वी.वीटर, एस.पी.शाईन, सी.बी. शाईन, ऍक्टिव्हा मोपेड, बाईक शाईन ड्रीम या वाहनाचा समावेश आहे. शहरातील शिवतीर्था समोरील राम होंडा ,पोलन पेठ मधील पंकज मोबाईल, अजिंठा चौफुली येथील सातपुडा मोबाईल येथे वाहने खरेदी साठी गर्दी दिसून आली.