जिल्ह्यात महाराणा प्रताप जयंती उत्साहात

0

अमळनेर । अमळनेर शहर व तालुका राजपूत एकता मंचतर्फे हिंदुसूर्य शुरवीर महाराणा प्रतापसिंह यांची 477 वी जयंती अतिशय जल्लोषात व थाटात साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले तर घोड्यावर विराजमान बाल महाराणा मिरणूकीचे आकर्षण ठरले. विश्राम गृहाजवळील महाराणा प्रताप चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार स्मिताताई वाघ, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील आदींसह ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी जि.प. सदस्य संदिप पाटील, माजी नगरसेविका मायाबाई परदेशी, माजी उपनगराध्यक्ष चदूसिंग परदेशी, नरेंद्रसिंग ठाकूर, रणजित पाटील, शेतकी संघ संचालक जितेंद्र राजपूत, अ‍ॅड. दिपेन परमार, अनिल पाटील, अजय पाटील, राजूसिंग परदेशी, प्रवीण पाटील, दिलीपसिंग पाटील, गुलाब पाटील, चेतन राजपूत, अमोल राजपूत, मानसिंग राजपूत, दिपेंद्र राजपूत, प्रकाश पाटील, सुशांत परदेशी, विलास पाटील यांसह समाज बांधवांच्या शुभहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पूजन आणि मल्यापर्ण करण्यात आले.

राजपूत समाज बांधवांची उपस्थिती
महाराणांच्या जयघोष करीत वाजत गाजत मिरवणुकीस सुरवात झाली. तत्पूर्वी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली शहरात काढण्यात आली या रॅलीनेही शहराचे लक्ष वेधले होते. शहरात ठिकठिकाणी भव्य डिजिटल बॅनर, भगवे झेंडे व चौकाचौकात रांगोळ्या काढण्यात आल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसत होते, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व नगरपरिषद यांच्या सहकार्याने महाराणा प्रताप चौकासह संपूर्ण परिसर चकचकीत झाला होता. मिरावणुकीदरम्यान ठिकठिकाणी आतिषबाजी करण्यात आली, मिरवणुकीत महिलांसह शहर व ग्रामीण भागातील राजपूत समाज बांधव, तरुण मंडळी आदींची संख्या लक्षणीय होती, घोड्यावर विराजमान बाल महाराणा प्रताप आकर्षक वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधत होता. मिरावणुकी दरम्यान माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक मोहन सातपुते, डॉ. संदेश गुजराथी, अर्बन बँक संचालक प्रवीण जैन, प्रा.डी.डी.पाटील, व ता पाटील, आमदार शिरिषदादा मित्र मंडळाचे नगरसेवक प्रवीण पाठक, सुनिल भामरे, धनु महाजन, किरण सावंत, पत्रकार किरण पाटील, किरण सावंत, शिक्षण मंडळ सभापती नितीन निळे, माजी नगरसेवक मुन्ना शर्मा, संजय पाटील, शिवाजीराव पाटील, विक्रांत पाटील, नरेंद्र चौधरी, दीपक चौगुले यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.

महाराणा चौकात समारोप
अर्बन बँक, सुभाष चौक, कारंजा चौक, बस स्टँड मार्गे मिरवणूक पुन्हा महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर कृषिभूषण साहेबराव पाटील, अनिल भाईदास पाटील यांनी समाज बांधवांसोबत बराच वेळ ठेका धरला. यानंतर शेवटी मान्यवरांच्या हस्ते चौकात पूजन होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. मिरवणुकीत सहा पोलीस निरीक्षक सालुंखे, बिर्‍हाडे, पो.कॉ. सुनील पाटील, भटुसिंग तोमर, होमगार्ड समदेशक नेरकर, राजू पाटील यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चाळीसगावात प्रतिमेची मिरवणूक ः शहरातील रेल्वे स्टेशन येथे महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने 28 रोजी महाराणा प्रताप यांच्या 477 व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जल्लोषात शहरातून मिरवणुक काढण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन माजी केद्रीय मंत्री एम.के.पाटील, आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीवदादा देशमुख आदि मान्यवरांच्याहस्ते करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार साहेबराव घोडे, नारायण अग्रवाल, पं.स.उपसभापती संजय पाटील, विश्वास चव्हाण, प्रमोद पाटील, कल्याण पाटील, सरदार राजपुत, भाऊसाहेब पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, नगरसेवक संजय राजपुत, सोमसिंग राजपुत, मानसिंग राजपुत, रामचंद्र जाधव, दिपक पाटील, घुष्णेश्वर पाटील, सूर्यकांत ठाकुर, चंद्रकांत तायडे, आनंद खरात, नितीन पाटील, नगरसेविका विजया पवार, संगिता गवळी, अलका गवळी, विजया पवार, सविता राजपुत, माजी नगरसेवक भगवान राजपुत, निलेश राजपुत, महेंद्रसिंग राजपुत, संजय घोडे, हरीनाना जाधव, संजय ठाकरे, माजी जि.प. सदस्य मुन्ना राजपुत, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. पूजन झाल्यानंतर रेल्वे स्टेशनपासुन जल्लोषात मिरवणुकीस सुरुवात झाली.

धरणगाव शिवसेनेतर्फे अभिवादन ः धरणगाव शहरात शिवसेनेची तालुका बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत अध्यक्षस्थानी सहकार राज्य मंत्री गुलाबरावजी पाटील यांनी स्विकारुन विविध विकास कामांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमात सुरूवातील नगर परिषद येथे हिंदूकुलभूषण विरपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या तैलचित्राचे अनावरण गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. प्रतिमा अनावर करुन मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले. नगरपरिषदेला धरणगाव राजपूत समाज पंच मंडळाकडून महाराणा प्रतापसिंह यांची प्रतीमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सूर्यवंशी यांनी केले. त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी आपल्या मनोगतातून शिवसेना जळगाव जिल्ह्यात करीत असलेल्या कामांबद्दल व धरणगाव शहरात भविष्यात काय-काय योजना शिवसेनेच्या आहेत. याबद्दल माहिती दिली. 30 मे ते 5 जून या कालावधीत भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यात शेतकरी कर्ज मुक्त कसा होईल, शेतकर्‍यांसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन उभारुन लोड शेडींग बंद करण्यासाठी अधिकार्‍यांना सांगून शेतकर्‍यांच्या नेहमी शिवसेना पाठीशी उभी राहील व शेतकर्‍यांना न्याय देईल, असेही जिल्हाप्रमुख ना. गुलाबराव वाघ यांनी सांगितले.