जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेचे दोन लाख लाभार्थी

0

जळगाव । जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी तसेच छोटया व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत विविध बॅकांमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी या योजनेतंर्गत विविध बँकांनी जिल्ह्यातील 2 लाख 3 हजार 799 लाभार्थ्यांना 710 कोटी 29 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले असून त्यापैकी 691 कोटी 98 लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी.पी. गिलाणकर यांनी दिली आहे.

मारक्रो फारनान्स कंपन्रा आघाडीवर
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज वाटपात मायक्रो फायनान्स कंपन्या आघाडीवर असून या कंपन्यांनी जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार 549 लाभार्थ्यांना 247 कोटी 26 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर खाजगी क्षेत्रातील व्यावसायकि बँकांनी 54 हजार 938 लाभार्थ्यांना 207 कोटी 69 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर छोट्या आर्थिक बँकांनी 26 हजार 64 लाभार्थ्यांना 74 कोटी 43 लाख रुपये, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँकांनी 6 हजार 744 लाभार्थ्यांना 107 कोटी 17 लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाशी संलग्न बँकांनी 1129 लाभार्थ्यांना 48 कोटी 69 लाख रुपये व ग्रामीण क्षेत्रातील बँकानी 375 लाभार्थ्यांना 6 कोटी 74 लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले असून तरुणांनी आपले स्वत:चे व्यवसायक सुरु केले आहे. असे व्यवस्थापक श्री. गिलाणकर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

असे झाले कर्जवाटप
शिशु गटासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. जिल्ह्यात या गटात 1 लाख 94 हजार 363 लाभार्थ्यांना 479 कोटी 42 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर किशोर गटासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्जाच्रा गटात 8 हजार 120 लाभार्थ्यांना 115 कोटी 32 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच तरुण गटासाठी 10 लाख रुपयांपर्यत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार या गटात 1 हजार 316 लाभार्थ्यांना 97 कोटी 24 लाख रुपयांचे असे जिल्ह्यात एकूण 2 लाख 3 हजार 799 लाभार्थ्यांना 710 कोटी 29 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून 691 कोटी 98 लाखाचे कर्जवाटप झाले आहे.