जिल्ह्यात मुबलक रासायनिक खतांचा पुरवठा उपलब्ध

0

जळगाव। जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. लागवडीच्या दुसर्‍या तीसर्‍या आठवड्यानंतर पिकांना खत टाकण्यात येत असतो. जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरु असून मुबलक खतांचा पुरवठा केला जाणार आहे. मागील वर्षाप्रमाणे खतांचा तुटवडा यावर्षी जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.जिल्ह्याभरात एकुण 47 हजार 829 मे.टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून त्यापैकी 33 हजार 245 मे.टन खत विक्री झालेला आहे.

खतांमध्ये युरीयाची सर्वाधीक मागणी असते. 16 हजार 235 मे.टन युरीयाचा पुरवठा करण्यात आला असून 6 हजार शंभर मे.टन युरीया विक्री झाला आहे. सुपर फॉस्फेटचा 4 हजरी 191 मे.टन पुरवठा करण्यात आला असून 2 हजार 948 मे.टन विक्री झाले आहे. डीएपी खताचा 2 हजार 296 मे.टन पुरवठा करण्यात आला असून 1 हजार 883 मे.टन डीएपी शिल्लक आहे.