जिल्ह्यात शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात !

0

नगरदेवळावासियांनी अनुभवला अभूतपूर्व सोहळा
नगरदेवळा । अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेले राजे शिवछत्रपती यांचा अभूतपूर्व शिवजन्मोत्सव सोहळा नगरदेवळा वासियांनी अनुभवला. आसमंतात उंच उंच फडकनारे भगवे ध्वज, शिवरायांवर आपली निष्ठा जपणारी तरूणाई तसेच शिस्तीने काढलेली शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत आसमंतात घुमणारा ’जय भवानी जय शिवाजी‘चा निनाद व त्यावर जल्लोष करणारे सर्व जातीधर्माचे शिवप्रेमी असा शिवजन्मोत्सव सोहळा नगरदेवळा वासियांनी अनुभवला. येथील जय बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन नगरदेवळा बाळद गटाचे जि.प.सदस्य रावसाहेब पाटील यांनी केले .यावेळी भैया महाजन, नामदेव पाटील, अविनाश कूडे, किरण काटकर, दलपत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपले विचार व्यक्त करतांना रावसाहेब पाटील यांनी सांगितले की, शिवाजी महाराज यांचे विचार व संस्कारांचा आदर्श घेवुन तरुणांनी महाराष्ट्र धर्म जाग्रुत ठेवावा तसेच नव्या प्रेरणेने समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा व शिवसंस्कृतिचा आदर्श बाळगावा. यानंतर मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठीकठिकाणी महिलांनी *सुंदर रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून महाराजांचे स्वागत केले. तसेच शिवाजी महाराज, राजमाता जिजावू व मावळे यांचा सजीव देखावा लक्ष वेधत होता. मिरवणूक यशस्वीतेसाठी रविंद्र पाटील सागर पाटील, रविंद्र महाजन, कडू पाटील, निलेश पाटील, मनोज पाटील, भूषण पाटील, उमेश तावडे, अनिल तावडे व सर्व जय बजरंग व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे शिवरायांना वंदन
महाराष्ट्र शाहीर परिषदेतर्फे आज शिवजयंती साजरी करण्यात आली. शाहीर परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे नगरदेवळा येथे जिल्हाध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील व कार्याकारणी यांनी प्रारंभी शिवराय पुतळ्याचे पुजन केले..तसेच पुष्पहार घालून अभिवादन केले. आजच्या काळात शिवाजी महाराजांच्या विचार व संस्कारांचा आदर्श घेवून तरूणानी महाराष्ट्र धर्म जागृत ठेवून नव्या प्रेरणेतून समाजातील विविध प्रकारचे विषमता नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा व शिवसंस्कृतीचा सदैव आदर करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांनी केले. यावेळी नगरदेवळा येथील माजी उपसरपंच नामदेव पाटील..शाहीर बाबुराव मोरे .राजेंद्र जोशी. उमेश तावडे, कुणाल राऊळ, सुरज राऊळ, हर्षल महाजन, गो.शि.म्हसकर व सहकारी कलावंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

लोहारा वाचनालयात माल्यार्पण
लोहारा । बहुजनांचे कैवारी हिंदू संस्कृतीची आन, बान, शान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येथील स्व.श्रीमती दमोताबाई सुर्वे सार्वजनीक वाचनालयात साजरी करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पाचोरा तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर राजपुत यांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी उपस्थित वाचकांमधून शिवाजी महाराज की जय! हा नारा एकमुखाने दुमदुमला जयंती साजरी करणेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष युवराज(बापु) पाटील, ग्रंथपाल बाळू पाटील, निवृत्त पोस्टमन हिरालाल बाविस्कर, वाचक ईश्‍वर भोलाणे, अमोल परदेशी, दिनेश सरोदे, खिलचंद कपडे, प्रशांत लिंगायत, जेष्ठ नागरिक भागवत कुमावत, महेंद्र भिल्ल, गणेश कोळी, दिपक मगरे आदी वाचक आदी उपस्थित होते.

पुतळा उभारणीसाठी संभाजी सेना व शिवभक्तांना यश
चाळीसगाव । संभाजी सेनेच्या वतीने शिवजंयती दिनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या नियोजीत जागी भूमिपुजन आंदोलन करण्याचा इशारा संभाजी सेनेने दिला होता. याप्रसंगी आज 19 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संभाजी सेनेनेे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आमदार उन्मेश पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाढे पाटील नगराध्यक्ष आशालता चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी आमदार साहेबांच्या साक्षीने अशी अपेक्षा व्यक्त करतो की पुढील वर्षी या जागेवर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला असेल आणि आपण सर्व शिवभक्तांच्या साक्षीने आमदार साहेब शिवरायांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे पूजन करतील त्यावेळेस लक्ष्मण शिरसाठ यांच्या अपेक्षेला उत्तर देतांना आमदार उन्मेश पाटील यांनी सांगितले की सर्व शिवभक्तांच्या वतीने बापूंनी व्यक्त केलेली अपेक्षा आणि संभाजी सेना व शिवभक्तांच्या आंदोलनांबाबत मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की, माझा शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे तरी आई जगदंबेच्या कृपेने पुढील वर्षी आपण याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करू हे माझे आश्‍वासन नव्हे तर या आंदोलनाच्या मंचावरून शिवजयंतीदिनी शिवाजी महाराजांच्या साक्षीने वचन देत असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका विजया प्रकाश पवार व विजया भिकन पवार, आधारच्या अध्यक्ष अ‍ॅड. आशाताई शिरसाठ, नगरसेवक घुष्णेश्‍वर पाटील,अरूण अहिरे जगदीश चौधरी, रामचंद्र जाधव, संजय ठाकरे, प्रभाकर चधरी, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, अजय जोशी, शरद पाटील, पत्रकार संघाचे आर.डी.चौधरी, एम.बी.पाटील तसेच अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

नांद्रा येथे शिवजयंती उत्साहात
नांद्रा । येथे सकाळी सरपंच शिवाजी तावाडे यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. दुपारी मराठा सेवा संघ व शिवप्रेमींनी गावातुन शोभायात्रा काढली. यावेळी गावातील असंख्य शिवप्रेमी यांनी परीश्रम घेतले. पाटील माध्यमिक विद्यालयातील मुला मुलींनी लेझीम पथकाने शोभायात्रेत लेझीम सादर केली. यासाठी उपशिक्षक गजानन ठाकुर यांनी परीश्रम घेतले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पुजन सरपंच शिवाजी तावडे यांच्याहस्ते करुन शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी उपसरपंच साहेबराव साळवे, पोलीस पाटील किरणा तावडे, उमेश पाटील, विश्‍वभर सुर्यवंशी, योगेश सुयवंशी, पंकज बाविस्कर, प्रा.यशवंत पवार, बालु पाटील, मेघराज सुर्यवंशी, बबलु बाविस्कर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य
चोपडा । छत्रपती शिवाजी महाराजांचे मोगलांशी राजनैतिक वैमनस्य होते मात्र धार्मिक वैमनस्य नव्हते. छत्रपतींच्या राज्यात जाती धर्माला थारा नव्हता त्यांनी सर्वांना सोबत घेत लढवैय्या मावळा तयार केला. त्यांचे राज्य हे खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य होते, असे प्रतिपादन छत्रपतींच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात सुमित्र अहिरे यांनी केले. शरदचंद्रिका पाटील नगरपालिका नाट्यगृहात बहुजन मुक्ती मोर्चातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात वक्ते म्हणून ते पुढे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सामाजिक क्रांतीमुळे राजनैतिक क्रांती झाली .पुरोगामी विचार तयार झाले या विव्हरवर आधारित शिवाजी महाराजांनी व्यवस्था निर्माण केली स्वराज्यासाठी मावळ्यांना सोबत घेत. रयतेचे राज्य निर्माण केले.

यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
यावेळी गसचे संचालक देवेंद्र सोनवणे, जगदीश पाटील, सलीम कुरेशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा मनीषा चौधरी, नगरसेवक जीवन चौधरी, कृउबा उपसभापती नंदकिशोर पाटील, संभाजी ब्रिग्रेडचे विभागीय अध्यक्ष प्रकाश पाटील, डॉ चक्रधर पाटील, शांताराम पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्पलवर्णा सत्तेसा तर प्रास्ताविक डॉ चक्रधर पाटील यांनी केले आणि आभार वीरेंद्र शिरसाठ यांनी मानले. यशस्वीतेसाठी बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रवीण सत्तेसा, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष वीरेंद्र शिरसाठ, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे तालुकाध्यक्ष असदअली सैयद, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे रमजान तडवी, खुमानसिंग बारेला यांनी घेतले.

एरंडोल येथे शिवप्रेमींनी काढली मोटारसायकल रॅली
एरंडोल । एरंडोल येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 388वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी शहराच्या माध्यभागी असलेल्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीनगराध्यक्ष देविदास महाजन होते.तर शहरातील मोठ्या संखेने शिवप्रेमी हजर होते.सकाळी शेकडो शिवप्रेमींनी मोटरसायकल फेरी काढली. तसेच धरणगाव चौफुलीवर दरवर्षाप्रमाणे शिवछत्रपती मित्रपरिवाराकडून महाराजांची आरास देखावा उभारण्यात आला होता. तर सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. सालाबादप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शहरातील अधिकार्‍यांविषयी नाराजी व्यक्त करतांना काही अधिकारी हे अशा राष्ट्रपुरुषांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही व काही अधिकारी हे कार्यक्रमाला उशिराने उपस्थित राहतात याबद्दल खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राकेश पाटील यांनी केले तर आभार प्रा.मनोज पाटील यांनी मानले. यावेळी माजीनागाराध्यक्ष रवींद्र महाजन, माजी नगरसेवक शालिक गायकवाड, जगदीश ठाकुर, नरेंद्र पाटील, नगरसेवक नितीन महाजन, नरेंद्र ठाकुर,कुणाल महाजन, योगेश महाजन, असलम पिंजारी, नगरसेविका वर्षा शिंदे, कल्पना महाजन, आरती महाजन, सुरेखा चौधरी, जगदीश पाटील, पं.स.उपसभापती विवेक पाटील, प्रमोद महाजन, रवी पाटील, चिंतामण पाटील, रवी जाधव, तासिलदार सुनिता जर्‍हाड, पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे आदि मान्यवर उपस्थित होते.

लोहार्‍यात शिव छावा गृपतर्फे शहरात मिरवणूक
लोहारा । येथील शिव छावा गृपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवाची सुरवात येथील बसस्थानकावरील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पोलीस पाटील सुरेंद्र शेळके यांचेहस्ते सकाळी 9 वाजता करण्यात आले. यावेळी मोठ्या संखेने शिव प्रेमी हजर होते. त्यानंतर मुख्य मिरवणूकीची सुरुवात संध्याकाळी 5 वाजता तानाजी नगर येथून करण्यात आली. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष तसेच छावा ग्रुपचे अध्यक्ष गणेश बविस्कर, उपाध्यक्ष आबा पाटील, कैलास चौधरी, बापु पाटील, सागर सुतार, मिलिंद आंबिकार, दशरथ सूर्यवंशी, तुषार पाटील यांचेसह छावा ग्रुपचे सर्व सदस्य हजर होते. सदर मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच मावळ्याचा सजीव देखावा मिरवणुकीचे आकर्षण होते. सदर मिरवणुकीत जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, पाचोरा तालुका शिवसेना प्रमुख दीपक राजपूत, संजय पाटिल, लक्ष्मण बविस्कर, विलास पाटील, दिनकर गिते यांची उपस्थिती होती. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिवप्रेमिनी घोषणानी मिरवणुकीत शोभा आनली होती. सदर मिरवणूक बसस्थानक, जगनाडे चौक, गांधी चौक, आम्बेडकर चौक भवानी चौक या मार्गाने तानाजी नगरात रात्री 9.30 वाजता विसर्जित करण्यात आली. यावेळी मिरवणुकीत पिंपळगांव हरेश्‍वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या सहकर्‍यांनी बंदोबस्त ठेवला होता.

शेंदुर्णीत शिवजयंती उत्साहात
शेंदुर्णी । आचार्य गरुड विद्यालयात शिवजयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ए.ए.पाटील हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्थाविक प्रा.सी.पी.पाटील यांनीकेले. तर मनोगतामधुन शिवचरित्रावर भाष्य करण्यासाठी भरत पाटील, प्रा.एस.आर.पाटील, वारंगणे व मानसी माळी यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.एस.बी.शेळके यांनी केले तर प्रा.एस.पी.पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यालयाचे उपमुख्यध्यापक डी.आर.शिंपी, पर्यवेक्षक एस.एस.जैन, अशोक पाटील, प्रा.व्ही.डी.पाटील, प्रा.डी.एम.महाले व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.