जळगाव । जिल्ह्यातून 1000 स्वयंसेवकांचे पथक आपत्तीच्या वेळी सज्ज राहणार त्यामुळे आजचे हे प्रशिक्षण अनन्य साधारण महत्वाचे असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी काढले. ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा आपात्ती व्यवस्थापनतर्फे संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन आयोजित प्रशिक्षणप्रसंगी बोलत होते. प्रशिक्षण 11 मे ते 15 मे दरम्यान हॉटेल रॉयल पॅलेस येथे गुरूवार 11 मे रोजी सुरुवात झाली.या प्रसंगी जिल्हा आपात्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे श्री. रावळ, राज्य शाखा मुंबईचे डॉ. कुर्णे व मनोज सकट, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव – विनोद बियाणी, सह सचिव राजेश यावलकर, प्रथमोपचार प्रशिक्षण समितीचे चेअरमन डॉ. विजय चौधरी, सह कोषाध्यक्ष व प्रशिक्षक जी.टी. महाजन, धुळे रेडक्रॉसचे अशोक पाटील – उपाध्यक्ष तसेच सदस्य – प्रा. यशवंत साळुंखे, रोहित कोटक, भारतभूषण भदाणे, नीता पाटील, मिना खंडेलवाल, रेडक्रॉसचे उज्वला वर्मा व लक्ष्मण तिवारी उपस्थित होते.
आयुक्त सोनवणे यांनी पुढे सांगितले की, आपत्ती येण्या अगोदर, आपत्ती आल्यावर व आपत्ती आल्यानंतर जी परिस्थिति निर्माण होते त्यात आपत्ती व्यवस्थापनाचे हजारो प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक अहोरात्र झटून आपतग्रस्थांचे, जीव वाचवणे आदी कार्य निस्वार्थपणे केले जात असल्याचे कुंभमेळ्यात अनुभवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावना जी.टी. महाजन यांनी केली. उपाध्यक्ष गनी मेमन , चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी , मानद सचिव विनोद बियाणी , सह सचिव राजेश यावलकर यांनी विचार स्पष्ट केले. उज्वला वर्मा यांनी सूत्रसंचलन केले तर डॉ. विजय चौधरी यांनी आभार मानले. प्रशिक्षणार्थीमध्ये वन्य जीवन सरांक्षण संस्था, अर्तनाद प्रशिक्षण संस्था, होमगार्ड विभाग, आपातकालीन जीवन रक्षक दल, महानगरपालिका, फायर सर्व्हिसेस, संस्कृती फाऊंडेशन, धुळे रेडक्रॉस पदाधिकारी व सदस्य व इतर सेवाभावी काम करणारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी 35 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.