जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून अतिसार नियंत्रण पंधरवडा

0

नंदुरबार । जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट 2017 या कालावधीमध्ये अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षेतखाली सभा झाली. या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.आर बी पवार, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षद लांडे उपस्थित होते.

अतिसार नियंत्रण पंधरवाडयात ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरील सर्व आशा अंगणवाडी, सेविका, आरोग्य सेविका यांच्या मार्फत कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी जावून सर्व्हेक्षण कार्यक्रमातर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांच्या पाल्याना ओ.आर.एस. बनविण्याबाबत हात धुण्याच्या पध्दती प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच अतिसार झालेल्या बालकांना 14 दिवसापर्यंत गोळी व ओ.आर.एस. पाकीटे देण्यात येईल. नंदुरबार जिल्हयातील अर्भक व बालमुत्यू कमी करण्यासाठी ही मोहिम यशस्वापणे राबविण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.