जिल्ह्यात 1 जुलैपासून विशेष मतदार नोंदणी मोहीम

0

धुळे। राज्याचा पहिला राज्य मतदार दिवस 1 जुलै 2017 रोजी साजरा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसर मतदार याद्या तयार करण्यात येत आहे. मतदार नोंदणीसाठी वाढविणे आणि मतदार याद्यातील त्रुटी दुरुस्ती करणे, तसेच 18 ते 21 वर्षे वयोगटातील युवांसाठी तसेच अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या नागरिकांसाठी 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी जे. आर. वळवी, शुभांगी भारदे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, रेवती कुलकर्णी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले. 1 जानेवारी 2017 च्या अर्हता दिनांकावर आधारित विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोहिमेत 18 ते 21 वर्षे वयोगटातील तरूणांची नोंदणी करणे वय वर्षे 18 वरील सर्व पात्र मतदारांची नोंदणी करणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.