जळगाव। जि ल्ह्यात भारतीय जनता पाटीच्या वतीने भाजपा स्थापना दिनानिमित्ताने ग्रामीण व शहर तर्फे जनकल्याण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय शताब्दीनिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली आहे. या निमित्ताने शेंदुर्णीत कार्यक्रमाचे आयोजन करून शहर कार्यकारिणी जाहिर करण्यात आली तर जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी स्व. पंडीत दिनदयाल उफाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने नगरपालिका चौकात आयोजित केेलेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले आहे.
शेंदुर्णी ग्रामपंचायत वाचनालयात उपाध्याय यांना अभिवादन
शेंदुर्णी । येथील भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने गुरूवार 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता येथील पहुर दर्जा ग्रामपंचायत वाचनालय चौकात भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस व पंडित दीनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच नारायण गुजर, प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल, जामनेर तालुका उत्सव समिती अध्यक्ष दिलीप खोडपे, उपाध्यक्ष अमृत खलसे, शहराध्यक्ष सुनील शिनकर, डॉ. सुरेश जैन, टी. के पाटील, तालुका सरचिटणीस रजनीकांत शुक्ल, नामदेव बारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रल्हाद गोढरी, श्रीकृष्ण चौधरी, दिनकर शिंपी उपस्थित होते. यावेळी गोविंद अग्रवाल यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकार राबवित असलेल्या सर्व प्रकारच्या लोक हितकारी योजना सामान्य माणसाच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच पंडीत दीनदयाल यांच्या कार्याचा गौरव केला व पक्ष संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे कार्य पक्षाचे कार्यकर्ते करीत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी शहर भाजपा अध्यक्ष सुनील शिनकर यांनी शहर कार्यकारणी जाहीर केली.
पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी कार्यक्रम
जामनेर । बोटावर मोजण्या इतपत खासदार व आमदारांची संख्या असलेल्या भाजपा पक्षाची आता गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता असून याचे श्रेय फक्त कार्यकर्ते आणि त्यांच्या अथक परिश्रमालाच द्यावे लागेल. त्यांच्यामुळेच देशभर वातावरण भाजपमय झाले असल्याचे मत भाजपा जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी स्व. पंडीत दिनदयाल उफाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने नगरपालिका चौकात आयोजित केेलेल्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. यावेळी अॅड. शिवाजी सोनार, नगरसेवक छगन झाल्टे, शंकर मराठे, श्रीराम महाजन, नवल राजपूत, धोंडू पाटील, बाबुराव हिवराळे, सुभाष पवार, रमाकांत पाटील, दिनेश सोनवणे आदि कार्यकर्ते उपस्थित हा
शहर निवड कार्यकारिणी याप्रमाणे
शहराध्यक्ष सुनिल शिणकर, उपध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष पंकज गुजर, राजेंद्र परदेशी, सरचिटणीस दिनेश कुमावत, दत्तात्रय गुजर, चिटणीस सुपडू ठाकूर, खजिनदार शंकर पाटील, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र अग्रवाल, देविदास पाटील तर सदस्य म्हणून देवचंद बारी, शंकर बारी, युवराज बारी, रमेश बारी, संजय गुजर, गफूर तडवी, संजय गोतमारे, शकील पिंजारी, भास्कर गुजर, संजय गुरव, किरण बारी आणि युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून श्रीकांत काबरा यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भाऊ अग्रवाल, अमृत खलसे, डॉ.सुरेश जैन, उपसरपंच नारायण गुजर, रजनीकांत शुक्ल यांनी अभिनंदन केले आहे.
चाळीसगाव स्वावलंबन मेळावा उत्साहात
चाळीसगाव । सिंधी मंगल कार्यालय येथे आयोजित स्वावलंबन मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष के.बी साळुंखे, तर प्रमुख माजी मंत्री एम के अण्णा पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, उमंग महिला परिवाराच्या संपदाताई उन्मेष पाटील, सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजयतात्या पाटील, गटनेते राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, प्रीतमदास रावलानी, माजी नगरसेवक तुकारामजी गवळी, अविनाशजी सूर्यवंशी, प्रभाकर चौधरी, यशवंत मराठे, संजय राजपूत, डॉ.सुभाष निकुंभ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, शहराध्यक्ष अक्षय मराठे, सभापती रविंद्र पाटील, विश्वास चव्हाण, पंकज साळुंखे, दिनेश बोरसे, नगरसेविका विजया पवार, संजुआबा राजपूत, चंद्रकांत तायडे, मानसिंग राजपूत, नितीन पाटील, चिरागोद्दीन शेख, सुरेशभाऊ स्वार आदी उपस्थित होते.