जळगाव – जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण उद्या दि. १० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार आहे. या लसीकरणासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३५ हजार डोस प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी ‘दै. जनशक्ती’शी बोलतांना दिली. दरम्यान सद्यस्थितीला जिल्ह्यात ३००० डोस शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.