जळगाव- आज पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील तातडीने मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाले असता सकाळी 3 वाजता नाशिक जवळील ओझर गावाजवळ त्यांच्या खाजगी वाहनाचा अपघात झाला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुठलीही जीवित हानी झाली नाही.
आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्ह्यात दुष्काळी दौरा असल्यामुळे त्या मुंबईहून निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत पती माजी जि.प.उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील व परिवार होते. नाशिक जवळील ओझर गावाजवळ स्पीड ब्रेकरवर गाडी असताना मागून ट्रॅकने जोराने धडक दिली असता वाहनाच्या मागील भागाचा चुराडा झाला. वर्षभरापासून अध्यक्षांच्या गाडीचा तिसऱ्यांदा अपघात झाला आहे.