जि.प.अध्यक्ष निवडीत अनेकांची नाराजी ओढवून घेतली: मंत्री के.सी.पाडवी

0

नंदुरबार: जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजेच ‘मिनी मुख्यमंत्री’. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. मात्र सगळ्यांनाच संधी देता येत नाही. त्यामुळे अनेकांची माझ्याबद्दल नाराजी निर्माण झाली. मात्र माजी आमदार पद्माकर वळवी हे लढवय्ये असल्याने त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यामुळे सगळ्यांची नाराजी ओढवून घेत, वळवी यांच्या कन्येला अध्यक्ष केल्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांनी सांगितले. शहरातील सीतामाईनगर येथे साकारण्यात आलेल्या संस्कृती भवनांचा लोकार्पण त्यांच्याहस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान सभापती निवडीदरम्यान घडलेल्या राजकीय घटनेबद्दल मला काहीही कल्पना नव्हती, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. मी पक्षाशी आणि पक्षाच्या तत्वाशी जोडलेला आहे असेही मंत्री पाडवी यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजेश पाडवी, जि.प.अध्यक्षा सीमाताई वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अविशंत पंडा, मुख्याधिकारी सपना वसावा, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, जि.प.सदस्य सुहास नाईक, सभापती रतन पाडवी, नगरसेवक संजय माळी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र माळी, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, काँग्रेस जिल्हा युवा अध्यक्ष संदीप परदेशी, तळोदा प.स.सभापती यशवंत पाडवी, बांधकाम सभापती रामानंद ठाकरे, आरोग्य सभापती योगेश पाडवी, पाणी पूरवठा सभापती अमानुदिन शेख, आदी उपस्थित होते.