धुळे- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांना कार्यालयातील समाजकल्याण निरीक्षकांने दमबाजी केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. यापूर्वी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधीतावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती बडगुजर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हा प्रकार सुरु होता. हा प्रकार नेहमी सुरु असतो. असे सांगत ऐकणार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ महिला अधिकारीला कार्यालयात समाजकल्याण निरीक्षक चक्क दमबाजी करतो. ही घटना धक्कादायक आहे. जिल्हा परिषदेत काम करणार्या महिला सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. निरीक्षकाची ही अरेरावी अशोभनिय आहे.
धुळे जिल्हा परिषदेत समाजकल्याण अधिकारी म्हणून हर्षदा बडगुजर ह्या कर्तव्य बजावतात. सोमवारी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर एकच गोंधळ सुरु होता. कार्यालयातील समाजकल्याण निरीक्षक हे मोठ्याने बोलत होते. तुम्ही माझ्यावर कारवाई तर करुन दाखवा, मी तुम्हाला पाहूण घेईल. मला शिकवू नका, माझी मानसिक स्थिती खराब करु नका, मला काही झाले तर जबाबदार तुम्ही असला. मी तुम्हाला पाहुन घेईन. अशी अरेरावी भाषेतून ते आपल्या वरिष्ठ अधिकारी हर्षदा बडगुजर यांना दमबाजी करीत होते. हा गोंधळ सुरु असतांना अनेक कर्मचारी आणि नागरिक पाहत होते. बडगुजर यांनी एक शब्द काढला नाही. संबंधित कर्मचार्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या कर्मचार्यांशी चर्चा करीत होत्या.
हा प्रकार धक्कादायक आहे. याबाबत बडगुजर यांना विचारणा केली असता, अनेक बाबी समोर आल्या आहेत. संबंधीत कर्मचार्याला साक्री तालुक्यात काम करण्याची इच्छा आहे. विविध योजनाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. कामात व कर्तव्यात बेजबाबदारपणा, उशिर करणे, माहिती दडवून ठेवणे यासह अनेक प्रकारण समोर आले आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाकडे कानाडोळा करून वाद घालणे नेहमीचे आहे.
याबाबत आपण वरिष्ठांना माहिती दिली आहे. संबंधीत कर्मचाराला नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. एका महिला अधिकारीला अशा पध्दतीने सर्वांसमोर अशा पध्दतीने अरेरावी केली जाते. चक्क दमबाजी केली जाते. याकडे वरिष्ठ दुर्लक्ष करतात. जिल्हा परिषद प्रशासनासाठी ही शर्मेची बाब आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण यांनी याकडे गार्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे.