लातूर । लातूरमध्ये ज्ञानाची खान असणारे व्यक्तीमत्व, नेतृत्व आहे आणि त्यामुळेच कुशल पिढी घडविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याबरोबरच शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करुन देण्याबरोबरच स्पर्धेत टिकणारा आणि माणूस म्हणून जगणारा विद्यार्थी घडविण्याचे काम जिल्हा परिषद शाळाच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा परिषद शाळांनी शिक्षणांचा लातूर पॅटर्न तयार करावा, असे मत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले.येथील दयानंद सभागृहात 2017 साठीचे जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री.निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुनिल गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, जि.प.अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे सभापती संजय दोरवे, बजरंग जाधव, संगिता घुले उपस्थीत होते.